शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

​गीतांबरोबरच बॉब डिलनच्या कुंचल्याचेही वेड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2016 6:02 PM

लंडनमधील हॅल्केयॉन गॅलरीमध्ये बॉब यांनी मागील दोन वर्षांत काढेलेल्या दोनशे पेंटिंग्सचे प्रदर्शन पाच नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

महान अमेरिक न गायक-गीतकार आणि नोबेल पारितोषिक विजेते बॉब डिलन केवळ त्यांच्या गीतांसाठी नाही तर त्यांच्या चित्रकारितेसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. लंडनमध्ये त्यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या सुमारे २०० चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येत आहे.त्यांच्या पेंटिग्समधून अमेरिकन जीवनपद्धती आणि संस्कृतीचे जिवंत चित्रण झळकते, असे कला समीक्षकांना वाटते. लंडनमधील हॅल्केयॉन गॅलरीमध्ये बॉब यांनी मागील दोन वर्षांत काढेलेल्या दोनशे पेंटिंग्सचे प्रदर्शन पाच नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.आॅईल, अ‍ॅक्रिलिक आणि वॉटरकलरचा सामावेश असणारी ही चित्रे या विसाव्यास शतकातील महान कलकाराची दुसरी बाजू दर्शवितात. काव्यत्मक गीतलेखनासाठी त्यांची यंदा साहित्यासाठी दिल्या जाणाºया नोबेल प्राईजकरिता निवड करण्यात आली. गीतलेखनासाठी हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच संगीतकार आहेत.                                                                    ग्रँड अ‍ॅरवोर बीचफ्रंट                                                                    किचेनेट                                                                   डान्स हॉलत्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर बरेच दिवस त्यांनी यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. काही दिवसांपूर्वी नोबेल प्राईज कमिटीने माहिती दिली की, बॉब यांनी फोन करून त्यांना पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल धन्यवाद दिले. मागच्या आठवड्यात स्वत: डिलन यांनी सांगितले की, मी डिसेंबर महिन्यात होणाऱ्या नोबेल पुरस्कार प्रदान सोहळ्यास हजर राहणार आहे.हॅल्के यॉन गॅलरीचे अध्यक्ष पॉल ग्रीन म्हणतात की, ‘त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करणे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. नोबेल प्राईज मिळाल्यामुळे तर हे एक्झिबिशन आणखीच स्पेशल झाले आहे.’करिअरच्या सुरुवातीपासूनच बॉबला चित्रकलेची आवड होती. कॅनडाचा रॉक ग्रुप ‘द बँड’च्या ‘म्युझिक फ्रॉम बिग पिंक’ या अल्बमचे कव्हर त्यांनी डिझाईन केले होते. यापूर्वी त्यांच्या पेंटिग्सचे मिलान आणि न्यूयॉर्क  येथे प्रदर्शन झालेले आहे.