शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

​आॅनलाईन शॉपींग करताना काळजीही आवश्यक ...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2016 1:36 PM

आॅनलाईन शॉपींग हा उत्तम पर्याय आहे

हल्लीचे युग हे धावपळीचे असून, कोणालाच वेळ नाही. याकरिता आॅनलाईन शॉपींग हा उत्तम पर्याय आहे. परंतु, ही शॉपींग करताना खबरदारी घेणेही आवश्यक आहे. अन्यथा मोठी आर्थिक फसवणूक होते.  नंतरला पश्चत्ताप करण्यापेक्षा   अगोदरच दक्षता बाळगणे गरजेचे आहे. आॅनलाईन शॉपींगमुळे वेळेची बचत होते. घरच्या घरी बसून आपण क्रेडिट व डेबीट कार्डच्या माध्यमातून  आॅनलाईन शॉपींग करु शकतो.   इंटरनेट बॅकींगच्या मार्फतही आपल्याला असा व्यवहार करता येतो. काय घ्यावी काळजी आॅनलाईन खरेदी करताना पासवर्ड लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अनेकजण पासवर्ड तयार करताना  लक्षात राहावे, याकरिता आपले नाव किंवा आडनावाचा वापर करतात. परंतु, यामुळे तुमचा पासवर्ड मिळविणे सहज शक्य होतो. तसेच आपला पासवर्ड हा दर तीन महिन्याला बदलत राहावा. पासवर्ड कुठेही लिहून ठेवू नये. खरेदी करताना डेबीट व के्रडिट कार्डवरील क्रमांक हा गोपणीय ठेवावा. इतरांच्या मोबाईल तसेच इंटरनेट कॅफेवरुन कधीही  आॅनलाईन शॉपींग करु नये. त्यामुळे आपली डिटेल माहिती मिळविणे कुणालाही सहज शक्य होते. त्याकरिता स्वत: च्या उपकरणाद्वारेच शॉपींग करावी. बाहेर कोणत्याही ठिकाणी आपण खरेदी केल्यानंतर आपले कार्ड हे त्यांच्या हातात देऊ नये. त्याकरिता स्वत: आपला पासवर्ड टाकून ते स्वॅप करावे. ज्या ठिकाणी कॅमेरे आहेत, तेथे कधीही आपल्या कार्डद्वारे पेमेंट करु नये. कॅमेºयामुळे आपल्या कार्डचा पासवर्ड त्यांना सहज मिळू शकतो. शॉपींग करताना वेबसाईटची खात्री करण्याकरिता यूआरएल टाकून ती चेक करावी. तसेच युजर नेम व पासवर्ड टाकण्यासाठी व्हर्च्युअर बॉक्सचा वापर करावा. त्यामुळे ते स्टोअर होत नाही. क्रेडिट कार्ड व्यवहारात एसएमएस अ‍ॅलर्टचा पर्याय निवडणे आवश्यक आहे. शक्यतो कॅश अ‍ॅन डिलीव्हरीचा पर्याय निवडावा. खरेदीनंतर आलेले ई- बिल तपासून घ्यावे. . आर्थिक तपशील भरतानाही काळजी घ्यावी. काय आहेत धोके आपला जर पासवर्ड गहाळ झाला तर आपणे सर्व आॅनलाईन व्यवहार तात्पुरते बंद होतात. तो पासवर्ड कुणाला सापडला तर मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते. आॅनलाईन शॉपींग करताना, आपल्याला काय वस्तू खरेदी करावयाची आहे. हे नीट लक्षात ठेवावे. अन्यथा आपल्या चुक ीमुळे पाहीजे नसलेली वस्तू आपल्याला मिळते. उत्सावानिमित्त शॉपींग करताना अधिक धोका होण्याची शक्यता असतेफसवणूकीत वाढआॅनलाईनमुळे कोणताही व्यवहार करणे हे सोपे झाले आहे. परंतु, डिटेल माहिती विचारुन फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. सुशिक्षीत असूनही अनेकांची भामट्यांकडून फसवणूक होते. बॅकेतून बोलत असल्याची थाप मारुन, ही फसवणूक केली जाते. याकरिता पोलीस प्रशासनाच्या वतीने नेहमी अशा प्रकाराला बळी न पडण्यासाठी जनजागृती केली जाते. तरीही हे प्रकार वाढतच आहेत. हे सर्व प्रकार दररोज सर्रास घडत आहेत. तरीही नोकरीच्या नावाखाली आॅनलाईन अर्ज मागवून पैसे उकळून फसवणूकीचे प्रकार होत आहेत. त्याकरिता आॅनलाईन व्यवहार हे चांगले आहेत. परंतु, त्याची सावधगिरीही बाळगावी. त्याचबरोबर आॅनलाईन मागविलेल्या वस्तूची खातरजमा करणेही आवश्यक आहे. ग्राहक मंचातही आपल्याला यासंबंधीची तक्रार नोंदविता येते. त्याकरिता पुरावे हे महत्वाचे आहेत.