शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

केस गळतीऐवजी कॅन्सरच्या पेशंट्सचे केस झाले काळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 5:51 PM

कसा झाला हा चमत्कार? पेशंट आनंदात, तर डॉक्टर उत्तराच्या शोधात..

- मयूर पठाडेकॅन्सर पेशंटचा मुख्य प्रॉब्लेम काय असतो? एकतर आधीच ते दुर्धर आजारानं त्रस्त असतात, शिवाय त्यांच्या डोक्यावरचे सारे केस उडून जातात. डॉक्टरांंचं तर म्हणणं आहे की, प्रत्यक्ष आजारापेक्षा बरेच रुग्ण त्यांच्या उडालेल्या केसांनीच अधिक खचतात आणि आपलं आता काही खरं नाही, आता आपले थोडेच दिवस राहिलेत अशा मानसिकतेत ते जातात.केमोथेरपीनंतर सगळ्यांचेच केस जातात, पण संशोधकांना नुकताच एक आश्चर्यजनक प्रकार पाहायला मिळाला. केमोथेरपीनंतर एका पेशंटच्या डोक्यावरील केस जाणं तर सोडा, उलट त्या पेशंटच्या डोक्यावरील पांढरे केस काळे झाले!ही अपवादात्मक घटना असेल असं अगोदर शास्त्रज्ञांना वाटलं होतं, पण त्यांनी अधिक खोलात जाऊन अभ्यास केला, शोध घेतला तर त्यांना आढळून आलं, असे तब्बल १४ पेशंट आहेत, ज्यांच्या डोक्यावरचे केस केमोथेरपीनंतर जाण्याऐवजी उलट त्यांच्या केसांचा रंग बदलला. म्हणजे ज्यांचे केस पांढरे, करडे होते त्यापैकी काहींचे ब्राऊन झाले, तर काहींचे काळे!कसं काय झालं असं?हा काय चमत्कार आहे?संशोधकांनी अधिक खोलात जाऊन अभ्यास केल्यावर त्यांच्या लक्षात आलं, कॅन्सरवर मात करण्यासाठी या साऱ्या रुग्णांवर नव्या प्रकारच्या थेरपीने उपचार करण्यात येत होते. त्याच थेरपीचा परिणाम म्हणून या साऱ्यांचे केस काळे झाले!यातील अनेकांनी पांढऱ्या केसांचे आपले जुने आणि काळ्या केसांचे नवे फोटो आनंदानं शेअरही केले.

पण त्यातही आश्चर्याची गोष्ट म्हणजे या नव्या पद्धतीने उपचार घेणाऱ्या साऱ्याच रुग्णांचे केस काळे झाले नाहीत. तरीही हे प्रमाण बऱ्यापैकी होतं. कॅन्सरच्या एकूण ४२ रुग्णांवर ही थेरपी वापरण्यात आली, त्यापैकी १४ जणांचे केस काळे झाले.आता ते नेमके कशामुळे झाले, केवळ त्यांचेच का झाले, इतरांचे का झाले नाही, या कारणानं शास्त्रज्ञ डोकं खाजवताहेत.त्यातलं आणखी एक गौडबंगाल म्हणजे हेच औषध याच आजारावर म्हणजे कॅन्सरवर वापरलं जात होतं, तेव्हा केमोथेरपीनंतर पेशंट्सचे केस गळत होते. मग आता असं काय झालं, की या रुग्णांना केसगळतीऐवजी काळ्या केसांचा उपहार मिळाला!

(फोटो सौजन्य- असोसिएटेड प्रेस)शास्त्रज्ञ त्याबद्दल अजूनही आपलं डोकं खाजवताहेत, पण त्याबद्दल त्यांचा अंदाज असा आहे, ज्या रुग्णांचे केस काळे झाले, ते सारे रुग्ण फुफ्फुसाच्या कॅँन्सरचे होते. इतर पेशंटही कॅन्सरनेच त्रस्त होते, पण त्यांचा कॅन्सर वेगळ्या प्रकारचा होता. आणि ही जी नवी थेरपी या रुग्णांवर वापरली गेली, त्यात असे काही घटक असावेत, की केसांतले मुळ रंगद्रव्य पुन्हा निर्माण करीत असावेत..या साऱ्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यात सध्या ते गुंतले आहेत, पण ज्या रुग्णांचे केस गळण्याऐवजी उलट काळे झाले, ते रुग्ण मात्र आनंदात आहेत. या किमयेमुळे ते पहिल्यापेक्षा अधिक तजेलदार आणि तरुणही दिसायला लागले आहेत...