क्रिस्टिानाचे ज्येष्ठांकडून शोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2016 4:04 PM
हॉलीवुड गायिका क्रिस्टिना एगिलेराचे म्हणणे आहे की, ती बालकलाकार असताना काही जेष्ठ मंडळी तिच्याशी गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न करीत असत.
हॉलीवुड गायिका क्रिस्टिना एगिलेराचे म्हणणे आहे की, ती बालकलाकार असताना काही जेष्ठ मंडळी तिच्याशी गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न करीत असत. मात्र यावेळी तिने कोणाचेही नाव घेणे टाळले. क्रिस्टिनाला ब्रिटनी स्पीयर्स, जस्टिन टिम्बरलेक आणि रयान गोस्लिनसोबत डिज्नी चॅनलच्या ‘मिकी माउस क्लब’मध्ये गाण्याची संधी मिळाल्यानंतर मोठा ब्रेक मिळाला होता. क्रिस्टनाने सांगितले की, लहानपणी माझे शारिरीक शोषण झाल्यामुळेच मी संगीताकडे वळले. त्याचबरोबर ती म्हणाली की, मुलींना लवकरच तीच्या सीमा आणि मापदंडांची जाणीव करून घ्यावी लागते. कारण मुलींने कुठले कपडे परिधान करावेत, ती जर स्मार्ट सेक्सी दिसत असेल तर तिला बºयाचशा मर्यादा येत असल्याचेही तिने सांगितले.