ख्रिसमस, नववर्षाच्या स्वागतासाठी बेस्ट अँप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:08 AM
ख्रिसमस, नववर्षाच्या स्वागतासाठी बेस्ट अँप्सवर्षाचा शेवटचा आठवडा आता सुरू झाला आहे. केवळ सहा दिवस शिल्लक आहेत. ख्रिसमस आणि नववर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी सर्वजण तयारी करत आहेत. यावेळी जर काही तरी हटके आणि क्रिएटिव्ह करायचे असेल तर पुढील पाच अँपचा तुम्ही वापर करू शकता.
वर्षाचा शेवटचा आठवडा आता सुरू झाला आहे. केवळ सहा दिवस शिल्लक आहेत. ख्रिसमस आणि नववर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी सर्वजण तयारी करत आहेत. यावेळी जर काही तरी हटके आणि क्रिएटिव्ह करायचे असेल तर पुढील पाच अँपचा तुम्ही वापर करू शकता.1. सँटा क्लॉस फोटो एडिटर ख्रिसमसच्या आनंददायी काळात क्रिएटिव्ह ख्रिसमस मेमे किंवा फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे असतील तर 'सँटा क्लॉस फोटो एडिटर' हे अँप तुमच्यासाठी बेस्ट आहे. ख्रिसमस स्टिकर, आर्टवर्क आणि शंभरहून आधिक ख्रिसमस फॉन्ट्स यामध्ये उपलब्ध आहेत. (आयओएस)२. सँटा स्कॅनरयंदा ख्रिसमसला कोणाला सँटा क्लॉसकडून गिफ्ट मिळणार हे जाणून घ्यायचे असेल 'सँटा स्कॅनर' इन्स्टॉल करा. मित्रांची, सहकार्यांची थोडीशी मजा घेण्यासाठी मस्त प्रँक अँप आहे. तुम्हाला हवी तशी सेटिंग क रून तुम्ही अँप कस्टमाईज करू शकता. (अँड्राईड)३. इन्व्हिटिड न्यू इअर पार्टी आयोजित करायची आहे? पार्टी ऑर्गनाईज करण्यात सर्वात वेळखाऊ काम म्हणजे सर्वांना आमंत्रण देणे. परंतु इन्व्हिटिड अँपद्वारे तुम्ही मित्रांना एकाच वेळी इन्व्हिटेशन पाठवू शकता. कोणकोण येणार याची नोंददेखील ठेवू शकता. (अँॅड्राईड)४. कयाक फ्लाईट्स, हॉटेल्स अँड कार्स नववर्षाचे स्वागत संपूर्ण कुटुंबासमवेत एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी करण्यापेक्षा अधिक चांगले काय असू शकते. परंतु, अशा व्हॅकेशन काळात स्वस्तात मस्त ट्रिप निवडण्याकरिता कयाक फ्लाईट्स, हॉटेल्स अँड कार्स अँप खूप कामी येते. ५. वेदर प्रोहिवाळ्याने आता पूर्ण जोर पकडला आहे. तुमच्या शहरात, देशात किंवा जगभरात वातावरण कसे आहे हे एक क्लिकसरशी जाणून घेण्यासाठी वेदर प्रो हे अँप आहे. ग्लोबल सॅटेलाईट आणि अँनिमेटेड रडार द्वारे तुम्ही तापमान, वादळची शक्यता वगैरे तपासू शकता. (आयओएस, अँड्राईड)