- मोहिनी घारपुरे-देशमुखफॅशन जगतावर प्रभाव असलेला पेन्टॉन कलर आॅफ 2017 म्हणून ‘हिरवा’ रंग घोषीत करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी हिरव्या रंगातली ‘फ्रॉग ग्रीन’ ही शेड फॅशन जगातील ट्रेण्डींग कलर ठरली आहे. म्हणूनच फॅशन डिझायनर्सकडूनही त्यास पसंती दिली जात आहे. 2000 सालापासून ढंल्ल३ङ्मल्ली कल्लू या न्यू जर्सीतील कंपनीतर्फे प्रतिवर्षी दोनदा कलर आॅफ द इयरची घोषणा केली जाते. त्याकरिता विविध देशांतील कलर स्टँडर्ड ग्रुप्सच्या प्रतिनिधींची दोन दिवसीय बैठक वर्षातून दोनदा आयोजित केली जाते. या बैठकीमध्ये वादविवाद आणि प्रेझेंटेशन यांच्या माध्यमातून ‘कलर आॅफ दी इयर’ निवडला जातो. त्यानंतर हा रंग फॅशन डिझायनर्स, फ्लोरिस्ट्स आणि अन्य कंपन्या आपल्या उत्पादनांमध्ये प्रामुख्यानं वापरतात. गेल्या वर्षी रोझ क्वार्ट्झ (गुलाबी रंगातील शेड) आणि सेरेनिटी (निळ्या रंगातील शेड) कलर आॅफ दी इयर म्हणून घोषित करण्यात आली होती.
यंदा कर्मिट, अर्थात बेडकीच्या हिरव्या रंगाची निवड कलर आॅफ दी इयर म्हणून कंपनीतर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा फॅशन जगतातही याच रंगाची चलती आहे. विशेषत: पुरूषांकरीता या रंगाच्या कपड्यांची निवड आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर्स करत आहेत. संपत्ती, समृध्दी आणि निसर्ग यांच्यातील परस्पर नातेसंबंधाचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या या रंगाला फॅशन इंडस्ट्रीत यंदा मानाचं स्थान मिळालं आहे.
एरवी हा रंग पुरूषांच्या वॉर्डरोबमध्ये फारसा आढळून येत नाही. त्यामुळेच सूट, वेस्टकोट्स, जॅकेट्स, फॉर्मल्स या सर्व प्रकारांमध्ये हा रंग प्रामुख्यानं वापरून ते कपडे बाजारपेठेत इन्ट्रोड्यूस केले जात आहेत. तर मग स्टायलिश राहणाऱ्या पुरूषांनी हिरव्या रंगाच्या कपड्यांची फॅशन करताना काही गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात. हिरव्या रंगाचे कपडे निवडताना हे नियम पाळा!1. जर तुम्ही गौरवर्णीय असाल तर गडद हिरव्या रंगाच्या कपड्यांना पसंती द्या. हिरव्या रंगाच्या हलक्या शेड्स, पेस्टल शेड्स, लाईम ग्रीन वगैरे शक्यतो वापरू नका. ते फारसे उठून दिसणार नाहीत. 2. गहूवर्णीय असाल तर तुम्हाला हिरव्या रंगाच्या बहुतांश प्रत्येक शेड्स वापरता येऊ शकतात. फक्त आॅलिव्ह ग्रीन वापरणं टाळा. आॅलिव्ह ग्रीन रंग फारसा खुलणार नाही. 3. सावळ्या किंवा त्यापेक्षाही गडद वर्णाचे तुम्ही असाल तर हलक्या हिरव्या रंगाच्या कपड्यांची निवड करा. तसेच जेड ग्रीन कलरही तुमच्यावर उठून दिसू शकतो, ट्राय करून पहायला हरकत नाही.