शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

गोंधळ - गोंगाटात बहरते ‘क्रिएटिव्हिटी’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2016 3:02 PM

‘कॉफीटिव्हिटी’ या वेबसाईटवर तुम्हाला केवळ कॉफी शॉपमधील गोंगाट-गोंधळ ऐकण्यास मिळतो.

आजकाल ‘प्रोडक्टिव्हिटी’बद्दल फार आग्रह असतो. केवळ काम पूर्ण करणे नाही तर त्याला काही तरी ‘क्रिएटिव्ह टच-अप’ देण्याची अपेक्षा केली जाते. ‘हार्डवर्क’ऐवजी ‘स्मार्टवर्क’ला प्राधान्य दिले जाते. आता ही प्रोडक्टिव्हिटी वाढवायची कशी?प्रोडक्टिव्हिटी वाढविणाऱ्या अनेक वेबसाईट, अ‍ॅप्स, ब्लॉग्स तुम्हाला आॅनलाईन मिळतील. पण या सगळ्यांमध्ये मला वेगळी वाटली ती ‘कॉफीटिव्हिटी’ ही वेबसाईट.एखाद्या कामात अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्यापैकी बऱ्याच जणांना गाणं ऐकण्याची सवय असते. आवडीचे गाणे हेडफोनमध्ये ऐकत काम करताना इकडेतिकडे लक्ष विचलित होत नाही. पण ‘क्रिएटिव्हिटी’ हवी असेल तर केवळ गाणे ऐकून फायदा नाही.‘कॉफीटिव्हिटी’ (Coffitivity) या वेबसाईटवर ‘मूड फ्रेशनर’ गाणी नाहीत, ना शांत करणारी पियानो इन्स्ट्रूमेंटल्स. येथे तुम्हाला केवळ कॉफी शॉपमधील गोंगाट-गोंधळ ऐकण्यास मिळतो. आत या गोंधळाचा आणि प्रोडक्टिव्हिटिचा संबंध काय?माणसाचा मेंदू एवढा जटिल आणि ‘विक्षिप्त’ आहे की, त्याचं ‘मेकॅनिझम’ अर्थातच कार्यपद्धतीचे जेव्हा विविध पैलू समोर येतात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. आता हेच बघा ना, कॅफेमधील गोंगाटामध्ये आपली क्रिएटिव्हिटी सर्वाधिक सक्रीय होते, असे शिकागो विद्यापीठाने केलेल्या एका रिसर्चचे म्हणने आहे.रिसर्चमध्ये तीनशेपेक्षा जास्त लोकांचा अभ्यास करण्यात आला. बौद्धिक क्षमतेचा कस लागेल असे काही टास्क त्यांना देण्यात आले. एका गटाला कॉफी शॉपमध्ये बसवले तर दुसऱ्या गटाला एका शांत ठिकाणी. विश्लेषणाअंती असे दिसले की, कॉफी शॉपमध्ये असणाऱ्या लोकांनी सर्व टास्कमध्ये दुसऱ्या गटातील लोकांपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली.सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे कॉफी शॉपमधील गोंधळात आपल्या डोक्याची चकं्र अधिक गतीने फिरू लागतात. एकदम शांत जागीच कामावर लक्ष लागते असा समज असणाऱ्याना हे तर खूपच शॉकिंग वाटेल.पण एक गोष्ट आहे की, सकाळी आंघोळ करताना, ब्रश करताना आणि एवढेच काय तर गाडी चालवतानासुद्धा एकदम अचानक भन्नाट ‘आयडिया’ सुचतात. म्हणजे काय तर करत असलेल्या कामात अतिजास्त प्रमाणात लक्ष केंद्रित करण्याऐवजी जर थोडेसे ‘डिस्ट्रॅक्ट’ असणे सृजनशीलतेला चालना मिळण्यासाठी खूप गरजेचे असते.मग याच रिसर्चचा आधार घेऊन अमेरिकेतील रिचमंड, व्हर्जिनिया येथील काही हुरहुन्नरी पोरांनी ‘कॉफीटिव्हिटी’ ही वेबसाईट (आणि अँड्राईड व आय-ओएस अ‍ॅप) सुरू केली. घरी बसल्या बसल्या किंवा कुठेही असताना ‘कॉफीटिव्हिटी’ कॉफी शॉपचे वातावरण निर्माण करते. वेबसाईटवरील कॉफी शॉपचे रेकॉर्डिंग ऐकताना असं वाटतं की, आपण कॅफेमध्येच बसलो आहोत. लोकांचा गोंधळ, कप-ट्रेचा आवाज यासह वातावरण निर्मिती केली जाते.तुमच्या मुडनुसार तुम्ही कॉफी शॉपचे वातावरण निवडू शकता. म्हणजे सकाळचा बिझी कॅफे, लंच टाईमचा शांत कॅफे किंवा मग कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा किलबिलाट असणारा कॅफे यांसारखे आॅप्शन येथे उपलब्ध आहेत. एवढेच नाही तर पॅरीस, ब्राझील आणि टेक्सासमधील कॅफेचा अनुभवदेखील तुम्ही घेऊ शकता. थोडक्यात काय तर कॅफेमधील केवळ कॉफी नाही तर तिथला गोंधळही आपल्या मेंदूला तरतरी आणतो.याला म्हणतात ‘कॉफी आणि बरंच काही’. किती साध्या गोष्टीवरून अशी ‘कामाची’ वेबसाईट बनवली. आपणही थोडं हटके विचार केला तर अशी एखादी भन्नाट कल्पना आपल्यालाही सुचेल.आॅडिबल नेचर!ज्यांना नुसता कॅफेचा गोंगाट ऐकायचा नसेल ते ‘साउंड्रॉऊन’ (रङ्म४ल्ल१िङ्म६ल्ल) या बेबसाईटला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला कॅफे बरोबरच पावसासह ढगांचा कडकडाट, समुद्राच्या लाटा, रात्रीची शेकोटी (आग), रात्रीचा किरकिराट, पक्ष्यांची किलबिल, रेल्वेडब्याचा खडखडाट, कारंज्याची खळखळ आणि बागेत लहान मुलांचा कल्ला असे विविध आवाज ऐकायला मिळतात.