‘कपिंग’ची क्रेझ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2016 1:08 PM
प्राचीन काळापासून चालत आलेली ही थेरपी आॅलिम्पिकच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अखेर काय आहे कपिंग?
जगातील सर्वोत्तम आॅलिम्पिक खेळाडू म्हणून गणल्या जाणाऱ्या मायकेल फेल्प्सने यंदाच्या रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत पाच सुवर्णपदके पटकावून आपले श्रेष्ठत्व कायम ठेवले. त्याच्या या भीम पराक्रमाचे जगभरात गोडवे गायले जात आहेत. या कौतुकवर्षावात सर्वाधिक चर्चा झाली ती त्याच्या खांद्यावरील जांभळ्या रंगाच्या डागांची.ते डाग काही जखमेचे नव्हते तर ते ‘कपिंग’ नावाच्या थेरपीचे होते. काय आहे ही कपिंग थेरपी, तिचा उपयोग काय याविषयी माहिती देणारे हे फीचर.कपिंग थेरपीकपिंग हा प्रामुख्याने अॅक्युपंक्चर थेरपीचा एक प्रकार आहे. प्राचीन काळापासून चीन आणि इजिप्तमध्ये तो वापरण्यात येतो. शरीरावर विशिष्ट जागी गरम ग्लास किंवा कप ठेवून निर्वाताद्वारे (व्हॅक्युम) त्या जागी रक्तपुरवठा वाढवण्यात येतो. त्यामुळे जागेवरील त्रास कमी होण्यास मदत होते. आजकाल जगभरात ‘कपिंग’चा ट्रेण्ड पसरला असून अधिकाधिक लोक आपल्या शारीरिक व स्नायूवेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ‘कपिंग’ थेरपीचा वापर करू लागले आहेत.अशी केली जाते ‘कपिंग’त्वचेवर ज्या ठिकाणी वेदना आहेत किंवा ज्या ठिकाणी रक्तपुरवठा वाढवायचा आहे अशा ठिकाणी गरम काचेचा ग्लास किंवा कप उलट करून ठेवतात. त्यामध्ये मंद ज्योत पेटवतात ज्यामुळे ग्लासमधील उरलेला आॅक्सिजन संपून पूर्णपणे निर्वात (व्हॅक्युम) निर्माण होतो. व्हॅक्युममुळे त्या ठिकाणी रक्तपुरवठा खेचला जातो. पाच ते दहा मिनिटे हे कप्स त्वचेवर ठेवले जातात. रक्तपुरवठा वाढल्याने त्या जागी लाल-जांभळ्या रंगाचे डाग दिसू लागतात. परंतु घाबरण्याचे कारण नाही. तीन-चार दिवसांत ते निघून जातात. कपिंगचे फायदेया थेरपीचा उपयोग करणारे मानतात की, स्नायू वेदना, वेदनाशमन, संधिवात, निद्रानाश आणि फर्टिलिटी समस्यांवर कपिंगमुळे लाभ होतो. कपिंगचा मूळ उद्देश म्हणजे शरीरातील ऊर्जा प्रवाहाला दिशा देऊन संपूर्ण शरीरात तिचे योग्य संतुलन राखणे हा आहे. मायकेल फेल्प्स आणि इतर अॅथलिट त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी कपिंग थेरपीचा वापर करतात. मसाज आणि इतर उपचारपद्धतींपेक्षा कपिंग उत्तम आहे असे त्यांचे म्हणणे आहे. सामान्य लोकांनादेखील कपिंगमुळे खूप लाभ होऊ शकतो. असं म्हणतात की, यामुळे व्यक्तीमध्ये नवचेतना निर्माण होते. स्नायूच्या वेदना, आकुंचन, मायग्रेन यासारख्या त्रासांपासून जलद आराम मिळतो. विज्ञान काय म्हणते?फार पूर्वीपासून जरी ही थेरपी अस्तित्वात असली तरी त्यापासून होणाºया लाभांना कोणताच वैद्यक शास्त्रीय पुरावा नाही. कित्येक नामवंत तज्ज्ञ मानतात की, कपिंग केवळ ‘फॅड’ असून त्यापासून कोणताच विशेष असा फायदा होत नाही. कपिंगमुळे स्नायूंच्या वेदनेवर कदाचित तात्पुरता आराम मिळेल परंतु दीर्घकाळासाठी या थेरपीचा कसा परिणाम होतो याविषयी पुरेशी वैज्ञानिक माहिती सध्या उपलब्ध नाही. काही क्रीडा तज्ज्ञ म्हणतात की, खेळाडूंना कपिंगमुळे केवळ मानसिक समाधान मिळते. यापेक्षा दुसरा काही याचा फायदा नाही. त्यामुळे कपिंग करावी की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण कपिंग करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरचा जरूर सल्ला घ्या.कपिंग कोणी करू नये?त्वचेचे आजार : तुमची त्वचा जर अतिशय संवेदनशील किंवा सोरायसिस, इसब किंवा इतर त्वचेच्या समस्या असतील कपिंग करणे टाळण्याचा तज्ज्ञ सल्ला देतात.हृदयविकाराचे रुग्ण : हार्ट पेशंटस्नी तर कपिंग करू नयेच. पेसमेकर बसवलेले असेल तर त्या व्यक्तीचे रक्त खूप पातळ असते. अशा लोकांनी या थेरपीचा वापर टाळावा.पाठ व कण्याची समस्या : ज्या लोकांना तीव्र पाठदुखी असेल किंवा पाठीच्या कण्याची समस्या असेल कपिंगमुळे ती आणखी बिघडण्याची शक्यता असते.कपिंग सेलिब्रिटी केवळ अॅथलिटस् आणि खेळाडूंमध्येच कपिंगची क्रेझ आहे असे नाही. अनेक हॉलीवूड सेलिब्रिटिज कपिंग करत असतात. ग्वेनेथ पॅल्ट्रो, जेनिफर अॅनिस्टन, जस्टिन बीबर, व्हिक्टोरिया बेकहॅम, डेनिज रिचर्डस् अशा अनेक सेलिब्रेटिंनी कपिंग केलेली आहे. प्रामुख्याने सेलिब्रेटींना असलेली ‘कपिंग’ची भुरळ आता सामान्य लोकांनासुद्धा पडू लागली आहे.