फॅशन ट्रेन्डमध्ये नवनवीन ट्रेन्ड येत असतात. आता क्रॉप टॉप्सनंतर क्रॉप पॅन्ट्सचा ट्रेन्ड फॅशन वर्ल्डमध्ये ट्रेन्डीगवर आहे. या क्रॉप पॅन्ट्सनाच कुलॉट्सच्या नावाने ओळखलं जातं. याचं वैशिष्ट्य म्हणजे ही पॅन्ट कमी उंचीच्या तर जास्त उंचीच्या मुलींनाही शोभून दिसते. जर अजून तुम्ही या पॅन्ट्स ट्राय केल्या नसतील तर सर्वात आधी अँकल लेन्थ असलेली पॅन्ट ट्राय करा. तुम्हाला हटके लूक मिळेल.
यासोबत वेअर करू शकता
कुलॉट्स तुम्ही कोणत्याही टॉपसोबत वेअर करू शकता. तुमच्यावर डिपेंड आहे की, तुम्हाला कोणता लूक करायचा आहे. जर तुम्हाला हाय वेस्ट कुलॉट्स ट्राय करायची असेल तर तुम्ही एका स्टायलिश क्रॉप टॉपसोबत वेअर करू शकता.
जर तुम्हाला लो वेस्ट आणि अॅकंल लेन्थ कुलॉट्स ट्राय करायचे असतील तर नी- लेन्थ कुर्तीवर तुम्ही ट्राय करू शकता. हा लूक तुम्हाला वेस्टर्न - एथनिक लूक देण्यास मदत करेल.
स्टायलिश किंवा फॉर्मल शर्टसोबत क्लासी लूक
बाजारात ए लाइन स्कर्टनुमा क्रॉप टॉपही उपलब्ध आहेत. ज्यांना स्टायलिश शर्टसोबत पेअर करता येऊ शकते. हेच नाहीतर ज्यूल्ड टॉप कुलॉट्ससोबतही वेअर करता येतं.
डे पार्टी नाइट आउटिंगचे बेस्ट आउटफिट्स
अनेक प्रकारच्या लेन्थ, स्टाइल आणि पॅटर्नमध्ये उपलब्ध असलेले कुलॉट्स फक्त स्टायलिश नाही तर ते परिधान करणंही फार कन्फर्टेबल आहे. त्यामुळे हे कोणत्याही ठिकाणी अगदी सहज परिधान करणं शक्य आहे. हे डे पार्टी, नाइट आउटिंग किंवा ऑफिसमध्येही तुम्ही वेअर करू शकता.
ऑफिससाठी निवडा फॉर्मल कुलॉट्स
जर तुम्हाला ऑफिसमध्ये कुलॉट्स वेअर करण्याती इच्छा असेल तर फॉर्मल लूक असणाऱ्या कुलॉट्सचीच निवड करा. तुम्ही एखाद्या फॉर्मल शर्टसोबत ट्राय करू शकता. फॉर्मल लूकसाठी तुम्ही मोनोक्रोमॅटिक कलरच्या कुलॉट्स वेअर करू शकता.