द. कोरियामध्ये ३-डी फिगरचे वेड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2016 11:34 AM
फोटोंच्या माध्यमातून ज्याप्रकारे तो क्षण आपण कायमचा कैद करून ठेवतो, ३-डी फिगर त्याचेच पुढचे पाऊल आहे.
संपूर्ण जगात सेल्फीची क्रेझ असताना द. कोरियातील लोकांना मात्र वेगळेच वेड लागले आहे. कॅमेर्यात फोटो काढून ते डिजिटली सेव्ह करणे किंवा प्रिंट करणे त्यांच्यासाठी मागासलेली बाब आहे. त्याऐवजी ते स्वत:ची, बाळाची आणि पाळीव प्राण्यांची त्रिमितीय (३-डी) फिगर बनवून घेणे पसंत करतात.‘आयओयज्’ नावाच्या ३-डी फिगर प्रिंटिंग कंपनीने असे त्रिमितीय आकार प्रिंट करते. अनेक लोक आपल्या लहान मुलांची ३-डी आकृती बनवून घेण्यासाठी त्यांच्याकडे येतात. फोटोंच्या माध्यमातून ज्याप्रकारे तो क्षण आपण कायमचा कैद करून ठेवतो, ३-डी फिगर त्याचेच पुढचे पाऊल आहे.त्यासाठी एका खांबाच्या आकाराच्या बूथमध्ये उभे राहावे लागते. मग शंभर कॅमेरे सर्व अँगल्सने २-डी फोटो काढतात. मग सेऊल येथे असणार्या कारखान्यात फिगर बनविणार्या मशीनसाठी याफोटोंच्या आधारावर ब्लूप्रिंट बनविली जाते. ही मशीन ५ सेंमी (दोन इंच) ते ३० सेंमी (१२ इंच) आकाराच्या फिगर्स बनवते. त्यासाठी सुमारे सहा हजार खर्च रुपये येतो. यापेक्षा तिप्पट पैसेदेखील लागू शकतात.‘आयओयज्’ची सहायक व्यवस्थापक ली सि-चीओन सांगतात की, कित्येक लोक आमच्याकडे त्यांचे बाळ, पाळीव प्राणी, कुटुंबासह येतात. काही प्रेमी जोडपेसुद्धा येतात.