उत्सवासाठी प्रेतांना काढले जाते बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2016 3:21 PM
इंडोनेशीयामधील सुलावेसी बेटावर ‘मानेने’ नावाचा हा एक उत्सव आहे. त्यामध्ये पुरलेल्या प्रेतांना बाहेर काढले जाते
प्रेत पुरल्यानंतर ते कधीच उकरुन काढले जात नाही. रितीरिवाजानुसार पूजाअर्चा केली जातो. परंतु, इंडोनेशीयामधील सुलावेसी बेटावर ‘मानेने’ नावाचा हा एक उत्सव आहे. त्यामध्ये पुरलेल्या प्रेतांना बाहेर काढले जाते. यामध्ये त्यांना केवळ बाहेरच काढले जात नसून, तर नवीन कपडे घालून सजविण्यातही येते. आपल्याला हे वाचून विचित्र वाटत असेल पण ते एक उत्सव म्हणून हे करतात. दर तीनवर्षाला हा उत्सव साजरा केला जातो. या प्रेताबरोबर हे लोकही फोटोही घेतात, त्याकरिता घरोघर जेवणही तयार केलेले असते. यामध्ये त्या प्रेतालाही खाद्यपदार्थांचा भोग दाखविला जातो. जवळपास आठवडाभर हा उत्सव सुरु असतो. हे प्रेत खराब होऊ नये, याकरिता केमिकलचाही वापर केला जातो. येथील लोकांचा मरणावर विश्वास नसून, मरणानंतरही व्यक्तिचा जीवन प्रवास सुरु राहत असल्याचा समज आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये पूर्वीपासून ही अशी विचित्र वाटणारी प्रथा सुरु आहे. १९७० पर्यंत या बेटाचा जगाशी कुठलाही संबंध नव्हता.