युरोपमध्ये मिळणार घटस्फोट आॅनलाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2016 2:45 PM
घटस्फोटासारखे कायदेशीर प्रकरणे आॅनलाईनच मिटवली जाणार म्हटल्यावर आश्चर्य वाटू नये.
सगळी दुनिया आॅनलाईन आणि आॅटोमेटिक होत असताना आता घटस्फोटासारखे कायदेशीर प्रकरणे आॅनलाईनच मिटवली जाणार म्हटल्यावर आश्चर्य वाटू नये. युरोप खंडातील काही देश या पर्यायाचा फार गांभिर्याने विचार करताना दिसत आहेत.घटस्फोटाची बोलणी, मालक-किरायादार वाद आणि इतर अनेक कायदेशीर संघर्ष वकिलाच्या मदतीशिवाय आणि कोर्टाची पायरी न चढता निकालात काढली जाणार आहेत. नेदरलँडमधील जोडपी आॅनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे घटस्फोट घेऊ शकतात. तेथील कायदे मंडळाने त्यासाठी ‘रोडमॅप टू जस्टीस’ हा आॅनलाईन प्लॅटफॉर्म २००७ पासून उपलब्ध करून दिला आहे. दरवर्षी सुमारे ७०० घटस्फोटांची प्रकरणे याद्वारे हाताळण्यात येतात. म्हणजे आगामी काळात घटस्फोटांचे वकिल बेरोजगार होणार की काय अशी शंका उपस्थित करण्यास काही हरकत नसावी.लवकरच इंग्लंड आणि कॅनडामध्येदेखील असे आॅनलाईन प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा विचार सुरू आहे. ब्रिटिश कोलंबियामध्ये यावर्षापासून संयुक्त सार्वभौमत्व वाद सोडविण्यासाठी आॅनलाईन नागरी ठराव न्यायाधिकरण स्थापन करण्यात येणार आहे.