दिवाळीसाठी ट्रेडिशनल लूक करण्याचा विचार करत असाल आणि लेहेंगा, साडीपेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमची मदत करू शकतो. तुम्ही जो काही परिधान करण्याचा प्लॅन केला असेल त्यातील फॅब्रिक थोडंसं लाइट ठेवा आणि दुप्पटा हेवी ठेवा. यातून तुम्हाला नवीन लूक मिळेल. हेवी दुपट्टा आणि सिम्पल ड्रेस फार सुंदर दिसेल.
अद्यापही दुपट्ट्याची क्रेझ
सध्याच्या काळात दुपट्ट्याची क्रेझ कमी होताना दिसतेय असं वाटत असतानाच या दिवसांमध्ये अजुनही त्याची क्रेझ कायम असल्याचे दिसून येते. फेस्टिव्ह सीझन सुरू होण्याआधीपासूनच बाजारात वेगवेगळे, रंगीबेरंगी दुपट्टे दिसू लागतात. थोड्या दिवसांपर्यंत जॉर्जेट, पॉलिस्टर, सूती दुपट्ट्यांची फॅशन होती. बदलत्या फॅशन ट्रेन्डनुसार वेगवेगळ्या प्रकराचे दुपट्टे बाजारात पाहायला मिळतात.
लाइट आणि हेवी वर्क दुपट्टा
एथनिक लूक मिळवण्यासाठी दुपट्टा असणं गरजेचं असतं. यामध्ये लेस, गोगापट्टी, चंदेरी सिल्कचे दुपट्टे ट्रेडिशनल लूकला सुंदर बनवतात. ब्राइट कलर्समध्ये हेवी वर्क म्हणजेच फुलकारी वर्कचे दुपट्टे फार ट्रेन्डमध्ये आहेत. तेच बंजारन, जामा, बांधणी आणि भागलपूरी दुपट्ट्यांची महिलांमध्ये क्रेझ दिसून येते.
गाउन आणि जीन्सवर कॅरी करा दुपट्टा
लेहेंगा, गाउन आणि मॅक्सी ड्रेस सुटवर दुपट्टा अनेकदा वापरण्यात येतो परंतु सध्या तरूणींमध्ये जीन्सवर दुपट्टा वेअर करण्याचा ट्रेन्ड आहे. सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे दुपट्टे उपलब्ध आहेत.
वेगवेगळ्या स्टाइल्समध्ये करा कॅरी :
वन साइडेड स्टाइल
कॉलेज गर्ल्समध्ये वन साइडेड स्टाइल सध्या ट्रेन्डमध्ये आहे. दुपट्टा हेवी असो किंवा लाइट तुम्ही कोणताही दुपट्टा वन साइड कॅरी करू शकता. अनारकलीसोबत दुपट्टा घेतल्याने तुमच्या लूक आणखी खुलण्यास मदत होते.
कमरेच्या चारही बाजूंना
दुपट्टा कॅरी करण्याची ही स्टाइल सगळ्यांमध्ये प्रसिद्ध आहे. यामध्ये कमरेच्या चारही बाजूंना दुपट्टा ड्रेप करून दुसऱ्या खांद्यांवर साडीच्या पदराप्रमाणे दुपट्टा घेण्यात येतो. हे दुपट्टे लेहेंग्यावर शोभून दिसतात.
वर्सेटाइल स्टाइल
दुपट्टा मानेभेवती चिकटवून ठेवणे ही सर्वत वर्सेटाइल स्टाइल समजली जाते. जर तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल तर मानेभोवती स्कार्फप्रमाणे गुंडाळून दुपट्टा तुम्ही ट्राय करू शकता. हे तुम्ही कुर्ता किंवा ब्लेझरवर ट्राय करू शकता.