अशी करा डिजिटल सफाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2016 3:36 PM
नुकताच दिवाळी सण सर्वांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. दिवाळीच्या अगोदर आणि नंतर घराची साफसफाई केली जाते. विशेषत: लोक आपल्या घराची सफाई करताना जुने साहित्य म्हणजेच निकामी वस्तू टाकून देतात.
- Ravindra Moreनुकताच दिवाळी सण सर्वांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. दिवाळीच्या अगोदर आणि नंतर घराची साफसफाई केली जाते. विशेषत: लोक आपल्या घराची सफाई करताना जुने साहित्य म्हणजेच निकामी वस्तू टाकून देतात. जेणेकरून त्याऐवजी नवे साहित्य सेट करू शकतील. डिजिटल जगतातदेखील काही गॅजेट्स खूप अव्यवस्था निर्माण करतात. अशावेळी डिजिटल सफाईदेखील आवश्यक आहे. मग डिजिटल सफाई काय आहे आणि कशी कराल, याबाबत आजच्या सदरात जाणून घेऊया... * सर्वप्रथम घरातील सर्व केबल, चार्जर आणि वायर्स एकत्र करा. बऱ्याच वर्षापासूनचे केबल्स आणि चार्जर्स आपल्या घरात पडलेले असतात. आपल्याला माहितदेखील नसते की, कोणती केबल कोणत्या डिव्हाइसची आहे. म्हणून अशी निकामी केबल, चार्जर त्वरित एकत्र करुन त्यांची सफाई करा. * बऱ्याच लोकांच्या ईमेलच्या इनबॉक्समध्ये हजारो ई-मेल पडलेले असतात. सर्वचजण ईमेल डिलीटदेखील करीत नाहीत. मात्र असे न केल्याने तांत्रिक अडचणी येऊ शकतात, म्हणून जे महत्त्वपूर्ण ईमेल नसतील त्यांना त्वरित डिलीट करा. त्यासाठी सर्वप्रथम इनबॉक्सच्या शेवटच्या पानावर जाऊन त्यापासून महत्त्वपूर्ण नसलेले ईमेल डिलीट करु शकतात. त्याशिवाय ट्रॅश फोल्डर आणि स्पॅम फोल्डरलाही डिलीट करुन त्याची सफाई करु शकतात. * बरेचजण मोबाईल, लॅपटॉप किंवा कंप्युटरमध्ये जास्तीचे अॅप डाउनलोड करतात. यामुळे बºयाच अडचणी निर्माण होतात. शिवाय स्क्रीनदेखील खराब दिसते. यासाठी सहा महिने ज्या अॅपचा वापर केला नसेल त्या अॅपला त्वरित अनइन्स्टॉल करा. * आपल्या डिव्हाइसमधील महत्त्वपूर्ण डाटा, फोटो आणि व्हिडिओ आदींना सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था करा. यासाठी डाटा बॅकअपसाठी आपण एक्स्टर्नल हार्ड ड्राइव्ह किंवा क्लाउड स्टोरेजची मदत घेऊ शकतात. * आज प्रत्येकजण सोशल मीडियावर सक्रिय आहे. बºयाचजणांची तर व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवर हजारोंची फ्रेंडलिस्ट असते. बºयाचदा या फ्रेंडस्ला आपण ओळखतदेखील नाही. मात्र या फ्रेंडस् पाठविलेल्या पोस्ट किंवा मेसेजेसमुळे आपल्या डिव्हाइसची मेमरी फुल होत असेल तर अशा फ्रेंडस्ना त्वरित अनफ्रेंड करा. * बऱ्याचदा आपण आपल्या डिव्हाइसच्या वेब ब्राऊजर्सवर आपण बुकमार्क आणि स्पीड डायल शॉर्टकट्स बनवून ठेवतो आणि त्याबाबतीत आपणास विसरदेखील पडलेला असतो. अशावेळी तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून वापरून झालेले बुकमार्कची त्वरित सफाई करुन टाका. * आपण आपल्या ब्राऊजरमध्ये असलल्या टेम्प फाइल्सदेखील क्लीन करु शकता. जर आपण ओपेरा यूज करत असाल तर आपले काम अजूनही सोपे होईल. फक्त आपल्याला टूल्समधील ‘डिलीट प्रायवेट डेटा’ वर क्लिक करायचे आहे, आणि त्यानंतर काय करायचे आहे हे आपणास ओपेरा ब्राऊजर खूप चांगल्या पद्धतीने मदत करेल. * वेब ब्राउजरमध्ये दिलेले एक्सटेंशन धोकेदायक वेबसाइट्स आणि लिंकपासून आपल्या डिव्हाइसचे संरक्षण करु शकतात. गुगल क्रोम ब्राऊजरमध्ये कित्येक एक्सटेंशन आहेत जे इंटरनेटवरील मॅलवेयरच्या आक्रमणापासून आपल्या डिवाइसला खराब होण्यापासून वाचवू शकतात. यासाठी त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. * आपल्या गॅजेटमध्ये वेगवेगळ्या विषयानुसार वेगवेगळ्या फाइल्स बनवा आणि त्यांना त्यानुसार नावेदेखील द्या. जेणेकरुन आपणास लक्षात राहील. गरज नसलेल्या फाइल्स लगेच डिलीट करा, यामुळे मेमरी वाचेल. शिवाय फाइल शोधायला वेळदेखील लागणार नाही. * स्मार्टफोन, टॅब आणि कंप्यूटरची आतील सफाई तर झाली, मात्र बाहेरच्या सफाईचे काय? यासाठी योग्य क्लिनरचा वापर करुन पुन्हा नव्या सारखे करु शकतात. गॅजेटच्या दुकानावरून योग्य प्रॉडक्ट्स घेऊ शकतात. साबणाच्या पाण्याने चुकूनही डिव्हाइसची सफाई करु नका.