शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

​दिवाळीनंतर अशी करा घराची साफसफाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2016 4:23 PM

प्रकाश आणि फटाक्यांचा उत्सव दिवाळी, सर्वांनीच एन्जॉय केला असेलच. हा उत्सव धनत्रयोदशी पासून सुरू होतो. त्यानंतर लक्ष्मी पूजन केले जाते. सोबतच हिंदू नववर्ष म्हणजे पाडव्याने या उत्सवाचा समारोप होतो.

-Ravindra Moreप्रकाश आणि फटाक्यांचा उत्सव दिवाळी, सर्वांनीच एन्जॉय केला असेलच. हा उत्सव धनत्रयोदशी पासून सुरू होतो. त्यानंतर लक्ष्मी पूजन केले जाते. सोबतच हिंदू नववर्ष म्हणजे पाडव्याने या उत्सवाचा समारोप होतो. यादरम्यान आपण प्रत्येक दिवशी रांगोळी काढतो, रात्री लॉनवर फटाक्यांची आतषबाजी करतो, घरालादेखील दिव्यांनी आणि फुलांनी सजवतो. संपूर्ण वातावरणात उत्साह, आनंद संचारलेला असतो. काय होते जेव्हा हा उत्सव संपतो? काही वेळापूर्वी आपल्या घराला नवीन आकर्षक लूक आलेला होता, त्याच घरात फरशीवर रांगोळी विखुरलेली पडलेली असेल, घराच्या अवतीभोवती फटाक्यांचे पेपर्स, प्लास्टिक व फ्लॅश पावडर, पूजा तसेच सजावटीसाठी वापरलेली फुले घरात इकडे-तिकडे पडलेले दिसतील. एवढेच नव्हे तर, दिवाळी संपल्यानंतर घरात मोठ्या प्रमाणात धूळ-मातीदेखील जमा झालेली असते. ज्याप्रमाणे दिवाळीच्या अगोदर घराची साफसफाई आणि सजावट महत्त्वाची असते, त्याचप्रमाणे दिवाळीनंतर देखील घराची साफसफाई महत्त्वाची आहे. आजच्या सदरात दिवाळीनंतरच्या साफसफाईबाबत जाणून घेऊया... १. अनावयक वस्तूंना हटवाशक्य तितक्या लवकर घराच्या सजावटीसाठी वापरण्यात आलेल्या वस्तूंना हटवा. त्यात दरवाजे आणि खिडक्यांवर लटकलेली कोरडी फुले लवकर काढून टाका. सोबतच रांगोळी ही फरशीवर इतरत्र पसरण्याअगोदर लगेच साफ करा.    २. किचनकिचनची साफसफाई सर्वात महत्त्वाची आहे. कारण दिवाळीनिमित्त बरेच खाद्यपदार्थ बनविण्यात येतात. किचनची दुरावस्था होणे साहजिकच आहे. दिवाळीनंतर साफसफाईसाठी थोडा वेळ काढून आपल्या किचनची साफसफाई व्यवस्थित करा. उत्सवात वापरलेली भांडी धुवून त्यांना पुन्हा आपापल्या जागी ठेवा आणि किचनला पुन्हा नवे रूप द्या.  ३. कपाटाची साफसफाईदिवाळीनिमित्त आपण नवे कपडे परिधान करतो. सोबतच एसेसरीज आणि वेगळ्या पद्धतीचे मेकअपदेखील करतो. असे केल्याने आपल्या कपाटात अस्ताव्यस्तता दिसू लागते. दिवाळीनंतर सफाईचे काम कपाटापासून सुरू करा. उत्सवात वापरण्यात येणारे कपडे आणि दागिने पुन्हा कपाटात व्यवस्थित ठेवा.४. धूळ-धूराची सफाईदिवाळीनंतर सर्वात जास्त समस्या धूळ आणि मातीची असते. फटाक्यांपासून निघणारी धूळ आणि धूर घरातील फर्निचर आणि अन्य वस्तूंवर जमा होते. धूळ साफ करण्यासाठी आपण व्हॅक्यूम क्लिनर किंवा कपड्यांचा वापर करु शकतो. फर्निचरसोबतच टेबल, पंखे आणि अन्य वस्तूंनादेखील चांगले साफ करा.५. यांना बदलादिवाळीनंतर घराला सुंदर दिसण्यासाठी आपण बेडशीट, बेडकव्हर, पडदे आणि सोफा कव्हर बदला. यामुळे आपले घर पुन्हा नव्याने आकर्षक दिसायला लागेल. ६. ओल्या कपड्यांनी सफाई करावर सांगितल्याप्रमाणे सर्वकाही केल्यानंतर ओल्या कपड्याने घरातील सर्व वस्तूंना चांगल्यापद्धतीने पुसा. यासाठी आपण क्लिंजरचाही वापर करु शकता.