औषधे घरात वेगवेगळया ठिकाणी ठेवली जातात....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:05 AM
औषधे घरात वेगवेगळया ठिकाणी ठेवली जातात. खिडकीत, फ्रिजवर, जेवायच्या टेबलावर, हॉलमध्ये, ...
औषधे घरात वेगवेगळया ठिकाणी ठेवली जातात. खिडकीत, फ्रिजवर, जेवायच्या टेबलावर, हॉलमध्ये, टीव्हीच्या बाजूला अशा या जागा असतात. पण, असे केल्याने औषधे एक तर मुदतीआधीच खराब होऊ शकतात, निरुपयोगी ठरू शकतात वा त्यात काही उपद्रवी रसायनाची निर्मिती होऊ शकते. घरातील लहान मूल वा पाळीव प्राणीही त्या खाऊ शकतात. त्यामुळे औषधे ही एका बंद डब्यात उष्णता, सूर्यप्रकाश, दमटपणा, पाणी यांपासून दूर व जिथे लहान मुले वा पाळीव प्राणी पोचू शकणार नाहीत अशा उंच जागी ठेवायला हवीत. गोळ्या, कॅप्सूल्स डब्यात, द्रव औषधे एखाद्या ट्रेमध्ये ठेवा व मलम, बाम यासाठी वेगळा डबा करा.