एका दिवसातच करा संपूर्ण मुंबई दर्शन !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2016 4:51 PM
सतत धावपळ, उत्साह, रोमांचकारी असणारे मुंबई शहर हे २४ तास जागणारे शहर म्हणून ओळखले जाते. अशी ही मुंबई जर एका दिवसातच अनुभवता आली तर हा अनुभव आपल्यासाठी आयुष्यभरासाठी अविस्मरणीय ठरणार हे नक्कीच.
सतत धावपळ, उत्साह, रोमांचकारी असणारे मुंबई शहर हे २४ तास जागणारे शहर म्हणून ओळखले जाते. अशी ही मुंबई जर एका दिवसातच अनुभवता आली तर हा अनुभव आपल्यासाठी आयुष्यभरासाठी अविस्मरणीय ठरणार हे नक्कीच. असे करा फक्त एका दिवसात मुंबई दर्शन पहाटेच हिल रोडला जाऊन गरमा-गरम चहाबरोबर भाजलेला ताजा ब्रेड, सिनॅमोन रोल्स व ब्ल्यू बेरी मफिन्स घेऊन दिवसाची सुरूवात करा. यामुळे ऊर्जा मिळण्यासही मदत होईल. यानंतर रणवार व चॅपेल स्ट्रीटवर फेरफटका मारत २०० वर्ष जुन्या ऐतिहासिक वास्तू व चर्च पाहू शकता. दुपारी सूर्य डोक्यावर आला की धारावीला जाऊन मनसोक्त शाँपिंग करु शकता. याठिकाणी लेदरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्ज, जॅकेट व बेल्ट येथे बघायला मिळतील. दरम्यान भूक लागल्यास वडापाववर ताव मारा. वॉशरमन कॉलनी म्हणजेच संपूर्ण मुंबईच्या धोबीघाटलाही भेट देता येईल. याठिकाणी तुम्हाला जगात प्रसिद्ध असलेल्या डबेवाल्यांचे मॅनेजमेंटही बघता येईल. यातून वेळ मिळालाच तर हाजी अली किंवा चोर बाजारला जाऊन या. स्प्रॉट रोडवरील एखादया पारसी हॉटेलमध्ये जेवण करा. सूर्य मावळतीला आला की कुलाब्याला जा. गरमागरम कॉफी घ्या व गेट वे आॅफ इंडियाकडे प्रस्थान करा. सरते शेवटी समुद्रात विसावणारा सूर्य बघण्यासाठी सूर्यास्ताला मरीन ड्राइव्हकडे वळा. न थकता व न थांबता केलेले हे मुंबई दर्शन आयुष्यभर स्मरणात राहील यात शंका नाही