बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी 'चलो शिमला'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:05 AM
बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी 'चलो शिमला'हिमाचल प्रदेशमध्ये पश्चिमी वार्यांनी आपली जादू दाखवायला सुरुवात केली आहे. दररोज हवामानात बदल जाणवत आहे. त्यामुळे सूयार्चा ढगांशी सारखा लपंडाव सुरू असतो.
हिमाचल प्रदेशमध्ये पश्चिमी वार्यांनी आपली जादू दाखवायला सुरुवात केली आहे. दररोज हवामानात बदल जाणवत आहे. त्यामुळे सूयार्चा ढगांशी सारखा लपंडाव सुरू असतो. शिमलातील लोक या हवामानाचा आनंद घेत आहेत. येथे सुरू असलेल्या बर्फाच्या वषार्वामुळे हा आनंद द्विगुणीत झाला आहे. शिमलासह प्रदेशातील उंच ठिकाणी रविवारी बर्फ वृष्टी झाली. त्यामुळे प्रदेशातील हवामानात अचानक गारवा निर्माण झाला. केलोंग लाहोल स्पिती येथे सर्वांत कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वरील प्रदेशात झालेल्या बर्फवृष्टीमुळे प्रदेशात गारवा पसरला आहे. त्यामुळे तापमानात 3 अंश सेल्सिअस कमी तापमानाची नोंद झाली आहे. या गुलाबी थंडीची मजा घेण्याची आणि डोंगरी भागांचे सौंदर्य पाहण्याची इच्छा असेल तर मग चला या विकेंडला शिमलाची सैर करुया...