दक्षिण भारताच्या टोकाशी असलेल्या श्रीलंकेत पर्यटनाचा आनंद म्हणजे प्रवास, निवांतपणा, वन्यजीवन, वारसा आणि संस्कृतीचा अनुभव. या देशात गेल्यानंतर कोणत्या पाच प्रमुख गोष्टी कराल याविषयी माहिती देत आहोत.उत्तरपूर्व किनाऱ्यावरील त्रिणकोमाली येथे तुम्हाला अत्यंत मनोहारी सागरदृष्ये पाहावयास मिळतील. स्रॉर्कलिंग करताना रंगीबेरंगी समुद्री जीवनाची अनुभुती घेता येईल. व्हेल माशांना पाहण्याची संधीही तुम्हाला प्राप्त होईल. निळ्या रंगाचे व्हेल आणि स्पर्म व्हेल मासे पाहण्यासाठी मार्च ते एप्रिल हा कालावधी उत्तम आहे. इतर महिन्यांमध्ये तुम्हाला १०० हून अधिक डॉल्फिन पोहताना आणि त्यांच्या पाण्यातील हालचाली पाहताना दिसून येतील.तुम्ही जर इतिहास आणि संस्कृतीचे प्रेमी असाल तर तुम्ही श्रीलंकेच्या प्रेमात पडाल. कोलंबोपासून अगदी जवळच्या अंतरावर कँडी शहरात तुम्हाला पाली दंताचे मंदिर दिसेल. अगदी पूर्वेला अनुराधापुरा आणि डाम्बुला ही शहरे आहेत. सिजीरिया रॉक फोर्टेसजवळच आहे. प्रत्येक स्थळ स्वत:चे वेगळे स्थान राखून आहे. इतिहास, संस्कृती आणि धार्मिक बाबतीत स्थानांचे महत्त्व आहे. हनुमानाची पाऊले असणारी बरीच स्थळे श्रीलंकेत आहेत.मध्य श्रीलंका आणि कोलंबो यांच्यादरम्यान पिन्नावाला हत्ती केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. आशियाई हत्तींची पैदास या ठिकाणी होते. या ठिकाणी सकाळी छोट्या हत्तींना भरविले जाते आणि दुपारी मोठ्या प्रमाणात त्यांना बाटल्यांच्या सहाय्याने भरविण्यात येते. छोटे हत्ती पाण्यात खेळताना तुम्हाला पाहता येईल.हिक्काडुवा ते हंबोटा या दाक्षिणात्य किनारी तुम्ही सूर्यस्रान, पोहणे, स्कुबा डायव्हिंग आणि सामुद्रिक आनंदाचा उपभोग घेऊ शकता. गॅले, वेलिंग्मा, टँजेली या बिचवर तुमच्या पर्यटनाचा आनंद द्विगुणित होईल.याला नॅशनल पार्कमध्ये सफारी करताना तुम्हाला रोमांचक अनुभव येतील. विशेषत: जगातील सर्वात अधिक चित्यांची संख्या असलेल्या या ठिकाणी तुम्हाला अगदी सहजरित्या चित्ते फिरताना दिसतील. मोहक पक्षी, हत्ती आणि इतर वन्यजीव या पार्कमध्ये तुम्हाला दिसू शकतील. अस्वल, लांडगे आणि ठिपके असणारे हरणांची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे.विमानसेवा: जेट एअरवेज, श्रीलंकन एअरलाईन्स यांची मुंबईहून कोलंबोसाठी थेट विमानसेवा आहे. निवास: सिनामोेन हॉटेल्स आणि रिसॉर्टस् यांची विविध ११ ठिकाणी राहण्याची सोय आहे. बजेट ट्रॅव्हलर्ससाठी घरगुती आणि एअरबीएनबीची सोय आहे
अनुभवा श्रीलंकेमधील पर्यटनाचा आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2016 5:38 PM