-ज्योती सरदेसाईउन्हाचा त्रास वाढतो आहेच. त्यात सनटॅन होतं, म्हणजे उन्हानं चेहरा, मान, हाताचे कोपर हे सारं काळं होतं. चेहऱ्याचं तेज गायब होतं. आण कितीही फेशियल करा, त्यानं तो तजेला येत नाहीच. चेहऱ्याला केमिकल तरी किती लावणार? त्यापेक्षा आपल्या घरात किचनमध्ये जा, आणि घरच्या घरी चेहरा तजेलदार तर कराच, पण रंगही उजळतो आणि साईड इफेक्टची शक्यता शून्य.त्यासाठी करायचे हे काही साधे उपाय.१) कडूनिंबाच्या पानांची पेस्ट
कडूनिंब हा गारवा देतोच. औषधीही असतो. कडुनिंबाची पानं घ्यायची. ती १० मिनिटं पाण्यात उकळवून घ्यायची. पाणी मंद गॅसवर आटू द्यायचं. मग त्या पानांची पेस्ट करायची. आणि ती मऊ पेस्ट चेहऱ्याला, मानेला, कोपराला लावायची. काळपटपणा दूर होतो. त्वचा नितळ होते.२) पपई आणि केळीचा गर
पपई गर घ्यायचा. त्यात थोडी केळी हातानं मऊ करुन टाकायची. मिश्रण एकजीव करुन चेहऱ्याला फेसपॅक लावा. नियमित लावला तर चेहरा उजळतो आणि चेहऱ्याची स्किनही टाईट होते.३)टमाटा+खसखस+ निरसं दूध