फेसबुकची लिगसी पॉलिसी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2016 1:13 PM
फेसबुकने गतवर्षापासून लिगसी पॉलिसी सुरु केली आहे.
फेसबुक ही सोशल मीडीया साईट जगभर सर्वाधिक चालणारी आहे. त्याचे सर्वाधिक युजर्स हे आपल्या भारतातच आहेत. या युजर्समधून एखाद्याचा मृत्यू झाला तरीही त्यांचे अकाऊंट हे सुरुच राहायचे. ही व्यक्ती मृत झाली हे सुद्धा काहींना माहिती होत नव्हते. त्याकरिताच फेसबुकने गतवर्षापासून लिगसी पॉलिसी सुरु केली आहे. यामध्ये त्या मृत व्यक्तीच्या जवळची व्यक्ती हे अकाऊंट वापरु शकते. परंतु, या व्यक्तिला त्या मृत व्यक्तीचे व्यक्तिगत मेसेज दिसत नाहीत. मात्र, फे सबुकवर आलेल्या रिक्वेस्टना उत्तर देता येते. कव्हर फोटो अपलोड करण्यासारख्या गोष्टीही करता येणे शक्य आहेत. यामध्ये फेसबुक अकाऊंट हे मेमोरियलाईज करण्याचा देखील पर्याय देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मृत पावलेल्या व्यक्तिचा पुरावा फेसबुकला दिल्यानंतर ते अकाऊंट मेमोरियलाईज करता येते. यानंतर हे अकाऊंट कुणालाही पाहता येत नाही.