शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
6
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
8
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
9
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
10
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
11
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
12
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
13
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
14
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
15
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
16
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
17
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
18
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
19
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
20
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा

​गुगल अलर्टचा निर्माता करतोय शेती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2016 5:36 AM

जर तुम्हाला सांगितले की गुगलमधील गलेगठ्ठ पगाराची नोकरी सोडून एक जण शेती करतोय तर तुम्ही काय म्हणाल?

कोणला गुगलमध्ये नोकरी करायला आवडणार नाही? भारतातील टॉप कॉलेजमधील विद्यार्थी तर गुगलमध्ये नोकरी मिळावी म्हणून जीवाचा आटापीटा करतात.जर तुम्हाला सांगितले की गुगलमधील गलेगठ्ठ पगाराची नोकरी सोडून एक जण शेती करतोय तर तुम्ही काय म्हणाल?शक्यच नाही!!पण हे खरं आहे. नागा कटारू त्याचे नाव आहे. भारतीयवंशाचा नागा ‘गुगल अलर्ट’चा निर्माता म्हणून ओळखला जातो. 2000 साली त्याने गुगलमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली होती तेव्हा तो कंपनीत रुजू झालेला केवळ चाळीसवा कर्मचारी होेता. गुगल त्यावेळी आजच्या एवढी मोठी कंपनी नव्हती.आंध्रप्रदेशमधील गम्पालगुडेम गावात नागाचे बालपण गेले. वडिल शाळेचे हेडमास्तर होते. तो सांगतो, ‘शिक्षणाच्याबाबतीत आमचे गाव फार मागासलेले होते. केवळ अर्धेच मुलं रोज शाळेत हजर राहत असत. परंतु मी शिकावे हा वडिलांचा आग्रह होता. म्हणून मी कॉम्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विषयात इंजिनियरिंग केल्यानंतर आयआयटीमध्ये प्रवेश घेतला.’(कॉलेजमध्ये असताना नागा कटारू)कॉलेज जीवनात नागाचा कॉम्प्युटरशी प्रथम संबंध आला. ‘आयआयटी’नंतर त्याची गुगलमध्ये निवड करण्यात आली. तो म्हणतो, ‘गुगलमध्ये आल्यावर खऱ्या अर्थाने माझ्या क्रिएटिव्हिटीला वाव मिळाला. सतत काही तरी नवी करण्याचा, नवे जाणून घेण्याचे खुले स्वातंत्र्य मी प्रथमच येथे अनुभवले.’‘गुगल अलर्ट’ची निर्मिती कथा सांगताना नागा सांगतो, ‘सर्वात आधी मी जेव्हा गुगल अलर्टची संकल्पना माझ्या वरिष्ठासमोर मांडली तेव्हा त्याने साफ फेटाळून लावली. त्याच्या मते, लोक गोष्टी जाणून घेण्यासाठी गुगलकडे येतात. आपणच जर त्यांना स्वत:हून माहिती पुरवू लागलो तर लोक कशाला गुगलवर सर्च करतील? अशाने कंपनीचा व्यावसाय कसा होणार?’पण या नकारामुळे नागा खचुन नाही गेला. स्वत:च्या संकल्पनेवर त्याला पूर्ण विश्वास होता. म्हणून तो थेट कंपनीचे संस्थापक सर्जी बिन आणि लॅरी पेजकडे गेला. त्यांना ‘गुगल अलर्ट’ची संकल्पना समजावून सांगितली. दोघांनाही ती खूप आवडली. त्याचे पेटंटही नागाला मिळाले. 2003 मध्ये ‘गुगल अलर्ट’ लाँच झाल्यापासून कोट्यावधी लोक त्याचा वापर करत आहे.(2000 मध्ये नागा कटारूची गुगलमध्ये निवड झाली)भारतातील एका छोट्याशा खेड्यातून आलेल्या 25 वर्षीय नागासाठी ही खूप गोष्ट होती. आठ वर्षे गुगलमध्ये नोकरी केल्यानंतर त्याला काही तरी नवे करण्याची ओढ शांत बसू देईना. तो म्हणतो, ‘माझ्य डोक्यात विचारांची घुसमट होत होती. आतापर्यंत मी केवळ एकाच गोष्टीत मी लक्ष देत होतो. आयुष्याच्या इतर वाटादेखील मला धुंडाळायच्या होत्या.’डोक्यात जेव्हा विचारांचे काहूर माजू लागले तेव्हा त्याने नोकरीचा राजीनामा दिला आणि माहितीपट निर्मिती आणि नाट्यक्षेत्रात उडी घेतली. काही वर्षे ते केल्यानंतर नागाने कॅलिफोर्नियातील मोडेस्टो येथे 320 एकर शेती विकत घेतली. तो सांगतो, ‘शेती मला भारत व्यतीत केलेल्या बालपणाची आठवण करून देते. पण शेती करण्याचा माझ्या विचार नव्हता. मला वाटले पाच वर्षानंतर जास्त किंमतीत ती विकून टाकेल.’येथेसुद्धाा आयुष्याने पुन्हा एकदा नवे वळण घेतले. त्याने शेतजमीन विकण्याऐवजी तेथे बादामाची शेती सुरू केली. शेतीमधले त्याला काही कळत नव्हते. पण आवडीमुळे अभ्यास करून त्याने स्वत:ला शिकवले. आजच्या घडीला नागा शेतीमधून सुमारे 15 कोटी रुपयांचे (2.5 मिलियन डॉलर्स) वार्षिक उत्पन्न घेतो. त्याच्या शेतावर आठ कर्मचारी काम करतात.(2001 साली नागाचे गुगल आॅफिस)एवढे करूनही नागा शांत बसण्याच्या मुडमध्ये नाही. त्याचे पुढचे ध्येय म्हणजे शेतीला अधिक टेक्नो सॅव्ही करणे. त्यासाठी तो सध्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातून इन्वायरन्मेन्ट अँड रिसोर्सेस विषयात एमएस आणि एमबीए करत आहे. तो म्हणतो, सिलिकॉन व्हॅलीपासून इतक्या जवळ असुनही शेतीमध्ये म्हणावा तितका तंत्रज्ञानाचा वापर होतान दिसत नाही. एक तंत्रज्ञ म्हणून यामध्ये सुधार करण्याचा मी प्रयत्न करत आहे.काय म्हणावे अशा अवलियाला? अशा ध्येयवेड्या तरुणांचा आदर्श आपण सर्वांनीच घ्यायला पाहिजे.(आपल्या बदामाच्या शेतात नागा कटारू)Photo Credit : Naga Kataru