शहरं
Join us  
Trending Stories
1
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
2
शेकडोंचा जमाव, घोषणाबाजी, दगड-विटांचा मारा, बांगलादेशात तीन मंदिरांची तोडफोड
3
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
विधानसभेच्या मतदानाआधीच काँग्रेसला लागली होती पराभवाची कुणकूण? तो अंतर्गत सर्व्हे चर्चेत
5
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
6
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
7
वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?
8
स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला...
9
Kalki Koechlin : "मी पैशासाठी अनेक गोष्टी..."; २ वर्षे काम नाही; वडापाव खाऊन अभिनेत्रीने काढले दिवस
10
"१०४ वर्षांचा झालोय, मला आता सोडा"; हत्या प्रकरणातील दोषीच्या याचिकेवर कोर्टाने दिला निर्णय
11
अरे बापरे! "कशाला लाज वाटायची?" म्हणत २४ वर्षीय मुलीने ५० वर्षांच्या वडिलांशी केलं लग्न
12
किंग कोहली अन् रुटपेक्षाही फास्टर ठरला Kane Williamson; जाणून घ्या त्याचा खास रेकॉर्ड
13
"आमच्याकडे हिंदू सुरक्षित, भारतातच अल्पसंख्यांकावर..."; बांगलादेशने प्रत्युत्तर देताना लावले आरोप
14
इथे शिव्या देण्यास मनाई आहे! महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीने केला अनोखा ठराव, दंडही ठरवला!
15
विराट कोहलीच्या आवडत्या कंपनीची कमाल, एका झटक्यात कमावले ८३८ कोटी रुपये
16
मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगली, भाजप धक्कातंत्र वापरणार?; मोहोळांनी स्वत: खुलासा करत संपवला सस्पेन्स 
17
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
18
'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेनं लग्नात हिंदीमध्ये घेतला हटके उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
December Born Astro: डिसेंबरमधले लोक असतात आळशी, हट्टी, तरी व्यक्तिमत्त्वाची छाप पाडण्यात होतात यशस्वी!
20
INDU19 vs PAKU19 : भारताविरुद्धच्या हायहोल्टेज सामन्यात टॉस जिंकून पाक संघानं घेतली बॅटिंग

Fashion : ​स्टायलिश स्कर्टची तरुणींमध्ये डिमांड !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 7:53 AM

मराठमोळा परकर किंवा घागरा हे झाले आपले पारंपरिक भारतीय कपडे. त्यालाच थोडा हटके टच देऊन, त्यापासून तयार झालेल्या स्टायलिश स्कर्टनी सध्या मुलींना भुरळ घातली आहे.

आजदेखील आपल्या वार्डरॉबमध्ये स्कर्टचे कलेक्शन असेलच. मात्र आपण जो स्कर्ट परिधान करीत आहेत तो आपणास सूट होतो का? याचाही विचार करायला हवा. फक्त दाखविण्यासाठी किंवा फॅशन ट्रेंड सुरु आहे म्हणून कोणताही स्कर्ट वापरु नये. शरीराच्या ठेवणीनुसारच स्कर्टचा वापर करावा. तरच आपले व्यक्तिमत्त्व खुलेल आणि सौंदर्यात भरदेखील पडेल.  मराठमोळा परकर किंवा घागरा हे झाले आपले पारंपरिक भारतीय कपडे. त्यालाच थोडा हटके टच देऊन, त्यापासून तयार झालेल्या स्टायलिश स्कर्टनी सध्या मुलींना भुरळ घातली आहे. त्यामुळे त्याची जोरदार हवा आहे... लांब लेहंगा किंवा लांब स्कर्टची. एथनिक स्टाइलमध्ये असणारे हे स्कर्ट तरुणींचं लक्ष वेधून घेताहेत. यामध्ये नेट, कॉटन, सिल्कचे बरेच पर्याय आहेत. फ्लोरल प्रिंटला तर तुफान मागणी आहे. सध्या तर दुपट्टे, स्कर्ट, टॉप्स, जॅकेट, चपला, शूज, बॅग सगळीकडेच फ्लोरल प्रिंट पाहायला मिळतेय. या फ्लोरल प्रिंटचा घेरदार स्कर्ट घागरा म्हणून, तर त्यावर चोळी म्हणून क्रॉप टॉप हे कॉम्बिनेशन उत्तम दिसेल. काळ्या रंगाचा स्लिव्हलेस क्रॉप टॉप, त्याखाली निळ्या किंवा हिरव्या, लाल, पिवळ्या, पांढऱ्या रंगाचा फ्लोरल प्रिंटचा स्कर्ट हे उत्तम कॉम्बिनेशन आहे. यावर विरुद्ध रंगाची ओढणी घ्यायला विसरू नका. ही ओढणी जराशी झगमगीत असू द्या. काळ्या रंगाचा टॉप असल्याने यावर सोनेरी किंवा आॅक्साइडची ज्वेलरी फारच खुलून दिसेल. आॅक्साइडचे दागिने एथनिक आणि आधुनिकही लुक देतात. तुम्ही सोनेरी, चंदेरी रंगाचे दागिने किंवा कंठहारही घालू शकता. बिड्सच्या दागिन्यांचाही पर्याय आहे. सध्या बांगड्या आणि ब्रेसलेटमध्येही वैविध्य दिसतेय. पारंपरिक लुक देणारे ब्रेसलेट वापरल्यास तुमचा लुक आणखीच खुलून दिसेल. स्कर्ट आणि क्रॉप टॉपवर हे उठून दिसेल. सोबत अँक्लेट आणि मोठे झुमके घालायला विसरू नका.