Fashion : स्टायलिश दिसण्यासाठी वापरा ‘शोल्डर ड्रेस’ !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 11:35 AM
जाणून घेऊया की कोणत्या प्रकारचे शोल्डर ड्रेस उपलब्ध आहेत आणि त्यामुळे आपला लूक कसा स्टायलिश दिसतो.
आपला लूकदेखील सेलिब्रिटींसारखा स्टायलिश दिसावा असे आजच्या तरुणींना वाटत असते. त्यामुळे त्या नानाविध प्रकारचे ड्रेस परिधान करीत असतात. मार्केटमध्येही स्टायलिशची वाढती क्रेझ पाहता डिमांडनुसार फॅशनेबल ड्रेसची निर्मिती केली जाते. सध्या अशाच प्रकारच्या शोल्डर ड्रेसची क्रेझ वाढली असून बहुतांश तरुणी याप्रकारचा ड्रेस परिधान करताना दिसत आहेत. जाणून घेऊया की कोणत्या प्रकारचे शोल्डर ड्रेस उपलब्ध आहेत आणि त्यामुळे आपला लूक कसा स्टायलिश दिसतो. ग्लॅमरस पार्टी लूकसाठी तुम्ही वन शोल्डर ड्रेस घालू शकता. यावर कमी ज्वेलरी घाला व मेकअपदेखील साधा करा. ही स्टाईल तुम्हाला गदीर्पासून वेगळे ठरवेल. स्टेटमेंट शोल्डरमुळे स्टायलिश व स्मार्ट लूक मिळतो. टॉप, शर्ट किंवा ट्युनिक्स अशा कोणत्याही कपड्यांवर स्टेटमेंट शोल्डर चांगले दिसते. खांदे व बॉटम यांच्यातील बॅलन्स कायम ठेवण्यासाठी मॅक्सी स्कर्टसोबत असिमेट्रिकल शोल्डर टॉप घाला. रंगीत मॅक्सी स्कर्टसोबत पॅटर्न मॅक्सी स्कर्ट उत्तम दिसेल. कोल्ड शोल्डर टॉप कोणत्याही आकाराच्या शरीरावर चांगले दिसतात. हे टॉप्स स्किनी ट्राऊझर्स, शॉर्ट किंवा मिनी स्कर्ट व पलाझो या कपड्यांवर सुंदर दिसतात. परंतु यांचे बॉटम न्यूट्रल असायला हवे. यामुळे टॉपचे आकर्षण कायम राहील. यावर गळ्यात काही घालू नका. स्टेटमेंट इअररिंग किंवा स्टॅक बँगल घालू शकता. यावर तुम्ही आॅक्सिडाईज्ड ज्वेलरी किंवा फ्लॅट सँडल घालू शकता. आॅफ शोल्डर टॉप किंवा ड्रेस घतल्यास रूंद पट्ट्याचा बेल्ट लावा. यामुळे तुम्हाला स्मार्ट लूक मिळेल. यावर काळ्या रंगाची जूती, स्टेटमेंट नेकपीस घाला. Also Read : Fashion : स्टायलिश दिसण्याच्या प्रयत्नात आपण जास्त पैसे तर खर्च करीत नाही ना? : Fashion : सध्या ‘या’ प्रकारच्या ब्लाऊजची आहे क्रेझ !