फॅशनेबल दागिन्यांची भुरळ !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2016 2:19 PM
इतरांपेक्षा आपण वेगळे वाटावे, अशा फॅ शनेबल दागिन्याकडे महिला व तरुणी वळत आहेत
आपले सौदर्य खुलविण्यासाठी नुसते कपडे व केशरचनेकडेच लक्ष देऊन चालत नाही. तर दागिने सुद्धा महत्वाचे आहेत. सध्याला महिला वर्गात चित्रपट व विविध वाहिन्यावरील सिरीयमलमधील अभिनेत्रीच्या अंगावर दाखविण्यात येत असलेल्या दागिन्यांची भुरळ असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.. यावरुन सेलिब्रिटी वापरत असलेल्या दागिन्याची छाप असल्याचे स्पष्ट होते.दागिने हा महिलांचा सर्वात आवडता प्रकार होय. अगदी पुरातन काळापासून आपल्या देशात दागिन्याला अन्ययसाधारण महत्व आहेत. इतिहासात प्रत्येक महाराणीच्या अंगावर दागिन्याचाच सर्वाधिक शृंगार दाखविण्यात आला आहे. यावरुन आपल्याकडे दागिन्याची परंपरा फार पुरातन आहे. दिवसेंदिवस त्यामध्ये नवनवीन फॅशन येत आहे. देवदास या कांदबरीवर आधारित असलेला देवदास हा चित्रपट २००२ मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये ऐश्वर्या रॉय -बच्चन व¸माधुरी दीक्षीत हीने केलेला दागिन्याचा श्रृंगार आजही लक्ष वेधून घेणारा आहे. त्या चित्रपटाच्या चित्रीकरणालाही मोठा खर्च आला होता. दागिन्यामुळेच तो गाजलेला होता व आजही दागिन्यामुळेच त्याला जास्त ओळखले जाते. तसेच अलीकडे प्रदर्शित झालेला बाजीराव मस्तनी या चित्रपटामध्येही विविध प्रकारचा दागिन्याचा श्रृंगार लक्षवेधक आहे. अशा चित्रपट व सिरीयलमधील फॅशन ही नेहमीच महिला व तरुणींना आवडते. दागिन्यावर नेहमी चित्रपट व सिरीयलची छाप असल्याचे दिसून येते. सध्या कोणत्याही ज्वेलरीमध्ये गेले तर हीच बाब समोर येते. यावरुन फॅशनेबल राहण्याकडे सर्वाचाच कल असल्याचे दिसून येत आहे. सध्या महिला तरुणीमध्ये सुरु असलेल्या या काही ही फॅ शन. लॉग वेस्टर्न लॉकेट : कॉलेज जाणाºया तरुणींचा ज्वेलरीमध्ये लॉग वेस्टर्न लॉकेट हा सर्वात आवडता प्रकार आहे. यामध्ये लॉग चैन, सिंगल पेंडल असे प्रकार आहेत. वेस्टर्न एरिंग्न्स : विविध खाजगी वाहिन्यावर सुरु असलेल्या सिरीयलमध्ये वेस्टर्न एरिंग्न्स हा प्रकार हमखास पाहावयाला मिळतो. त्यामुळेच तरुणीमध्ये ही एरिंग्न्स फॅशन आली असून,त्याला मोठी पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. मॅचींग एरिंग्न्स : ड्रेस व साडीनुसार मॅचींग एरिंग्न्स परिधान करता येतात. यामध्ये कलरफुल झूमके हा पॅटर्न सर्वात जास्त चालणारा आहे. लग्नसराई, पार्टी आदी कार्यक्रमात हा मॅचींग एरिंग्न्स ड्रेस व साडीनुसार आपल्याला दिसून येतो. तसेच प्रत्येक सेलिब्रिटी सुद्धा मॅचींग एरिंग्न्सवर हमखास दिसतात. माळा टाईप सेट : हा प्रकार वेगवेगळ्या कलरफुल बीट्समध्ये बनलेला असतो. महिलांपेक्षा तरुणींना हा प्रकार सर्वाधिक आवडतो. तसेच विविध चित्रपटामध्येही सेलिब्रिटीनी माळा टाईप सेट परिधान केल्याचे दाखविण्यात आले आहे. वेस्टर्न ब्रासलेट : लॉग कुर्तीजवर मोठ्या प्रमाणात वेस्टर्न ब्रासलेट घातले जाते. एअर क प्स : यामध्ये वेगवेगळे प्रकार आहे. तसेच ते फॅशनेबल असल्याने महिला व तरुणींच्या अधिक पसंतीला उतरतात. त्यामुळे हंगाम कोणताही असला तरीही एअर क प्स हे अधिक चालतात. -----------