शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
2
"मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
4
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
5
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
6
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
7
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
8
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
9
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
10
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
11
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
12
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
13
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
14
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
15
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
16
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
17
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
18
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
19
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
20
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी

FIFA U-17 World Cup : अमेरिकेविरुद्धच्या सलामी सामन्यात भारताचा पराभव   

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2017 10:59 PM

येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या 17 वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सलामी सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला.

नवी दिल्ली : भारतीय संघाला शुक्रवारी येथे जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये १७व्या फिफा अंडर १७ वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत प्रबळ दावेदार मानल्या जाणाºया अमेरिकेकडून ०-३ गोलने पराभव पत्करावा लागला. तथापि, पराभवानंतरही भारतीय संघाने आपल्या प्रेरणादायी कामगिरीने उपस्थितांची मने जिंकली. त्याचप्रमाणे फिफा स्पर्धेत सहभागी होणारा पहिला भारतीय संघ बनूनही इतिहास रचला. अमेरिकेकडून कर्णधार जोश सार्जेंटने पेनल्टीवर ३१व्या मिनिटाला, ख्रिस डॉर्किनने ५२व्या आणि अँड्र्यू कार्लटन याने ८४व्या मिनिटाला गोल केला.

स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढविण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही आणि जसा चेंडू भारतीय खेळाडूंजवळ आला, तसे त्यांना प्रेक्षकांचा जास्त पाठिंबा मिळत होता. त्याचा परिणाम खेळाडूंवरदेखील झालेला दिसला. भारतीय खेळाडूदेखील आपल्या पालक आणि प्रेक्षकांसमोर सर्वोत्तम कामगिरी करू इच्छित होते. त्यात गोलरक्षक धीरज मोईरांगथेम याच्याशिवाय कोमल थाटल आणि सुरेश वांगजाम व फॉरवर्ड अनिकेत जाधव यांची कामगिरी प्रशंसनीय ठरली.

सामन्याच्या प्रारंभीच गोलरक्षक धीरजने अमेरिकेचे गोल करण्याचे अनेक प्रयत्न हाणून पाडले. १५व्या मिनिटाला मिडफिल्डर अँड्र्यू कार्लटनने मारलेल्या फटक्याचा धीरजने सुरेख बचाव केला. पाच मिनिटांनंतर राहुल कनोली याने अमेरिकेचा गोल करण्याचा प्रयत्न रोखला; तथापि भारतीय खेळाडूच्या चुकीने अमेरिकेला पेनल्टी मिळाली आणि त्यावर जोश सार्जेंट याने गोल करून अमेरिकेला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ४३व्या मिनिटाला अनिकेत जाधवला २५ यार्डांवरून गोल करण्याची संधी मिळवली; परंतु तो त्याचा फायदा घेऊ शकला नाही. पूर्वार्धात अमेरिकेने १-० अशी आघाडी घेतली; पण उत्तरार्धात त्यांनी सुरुवातीलाच आक्रमकता दाखवली.

तथापि, अमेरिकेसाठी दुसरा गोल ५१व्या मिनिटाला ख्रिस डॉकिन याने केला. त्यानंतर थाटलने दमदार फटका मारला; परंतु गोलरक्षक जस्टिन गार्सेस याला चकवण्यात त्याला यश मिळाले नाही. पुढच्याच मिनिटाला कार्लटनने गोल करून अमेरिकेची आघाडी ३-० अशी वाढवली. आता भारतीय संघ ९ आॅक्टोबर रोजी कोलंबिया संघाविरुद्ध दोन हात करेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थितीभारतीय संघाच्या अंडर १७ वर्ल्डकपच्या अमेरिकेविरुद्ध होणाºया लढतीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पोहोचले. भारतात प्रथमच फिफा स्पर्धा होत आहे आणि आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात या स्पर्धेविषयी रोचकता दाखवणारे मोदी व्हीआयपीए मंचावरून उतरत मैदानावर पोहोचले. तेथे त्यांनी भारत व अमेरिकेच्या फुटबॉलपटूंशी हस्तांदोलन केले. त्यानंतर दोन्ही देशांचे राष्ट्रगीत झाले.याप्रसंगी भारताच्या महान फुटबॉलपटूंना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, आशियाई फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष शेख सलमान इब्राहिम अल खलिफा उपस्थित होते.मोदी यांनी व्हीलचेअरवर आलेल्या पी. के. बॅनर्जी, बायचुंग भुतिया, सुनील छेत्री, सईद नईमुद्दीन, आय. एम. विजयन, बेमबेम देवी यांना शाल व प्रतीक चिन्ह प्रदान केले. चुनी गोस्वामी यांचेदेखील नाव घेण्यात आले; परंतु ते याप्रसंगी उपस्थित नव्हते.

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017FootballफुटबॉलSportsक्रीडा