शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

फिगर छान आहे, फॅशनचीही आवड आहे. मग बॉडीकॉन किंवा बॅण्डेज ड्रेस ट्राय करा ना..एकदम सेलिब्रिटीसारखा फील येईल! -

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2017 4:13 PM

तुम्ही फिगर कॉन्शस असाल आणि जर तुमची मेजरमेंट्स एकदम परफेक्ट असतील तर तुमच्यासाठी ‘बॉडीकॉन ड्रेसेस’ हा फॅशनकरीता एक उत्तम पर्याय ठरू शकेल.

 

मोहिनी घारपुरे-देशमुख

तुम्ही फिगर कॉन्शस असाल आणि जर तुमची मेजरमेंट्स एकदम परफेक्ट असतील तर तुमच्यासाठी ‘बॉडीकॉन ड्रेसेस’ हा फॅशनकरीता एक उत्तम पर्याय ठरू शकेल. विशेषत: नाईट आउट प्लान केला असेल तर एखादा सुंदरसा बॉडीकॉन ड्रेस घालून काही मीनिटातच तुम्ही तयार होवू शकता. विशेष म्हणजे तुमची फिगर हायलाईट करणारे हे ड्रेसेस अत्यंत सुंदर दिसतात.

साधारणत: 90 च्या दशकात हे ड्रेसेस फार लोकप्रिय झाले होते. उंच, सडपातळ बांध्याच्या अभिनेत्रींनी किमान एखाद्या तरी वेळी बॉडीकॉन ड्रेस घातल्याचं पाहायला मिळतं. 1920 मध्ये हे ड्रेसेस विशेषत्त्वानं समोर आले. तर 1930 ते 1970 या दरम्यान या ड्रेसेसची ओळख सुपर ग्लॅमरस फॅशन म्हणून झाली होती. विशेषत: 1980 च्या दशकात तर अभिनेत्री आणि ग्लॅमरस मानल्या जाणाऱ्या सर्व क्षेत्रातील महिला बॉडीकॉन ड्रेसेसच परीधान करताना दिसू लागल्या होत्या. त्याच दरम्यान फॅशन डिझायनर अझेदीन अलाईयाने किंग आॅफ क्लिंग नावानं महिलांच्या बॉडीकॉन ड्रेसेसचा एक मोठा ब्रॅण्डच बाजारात आणला. त्याचबरोबर पॅको रबाने नामक आणखी एका फॅशन डिझायनरनं याच दरम्यान बॉडीकॉन ड्रेसेसशी साधर्म्यअसलेले चेनमेल ड्रेस तयार केले. एकंदरीतच फॅशन जगतात हे बॉडीकॉन ड्रेसेस बऱ्याच दशकांपासून वर्चस्व गाजवत आहेत.

 

शरीरसौष्ठव उत्तम असलेल्या तरूणींना किमान एकदा तरी हे बॉडीकॉन ड्रेसेस ट्राय करावेसे हमखास वाटतातच बॉडीकॉन ड्रेसेसची विशेषता म्हणजे हे स्लीम फिट असतात तसंच या ड्रेसेसचे गळे अत्यंत आकर्षक आणि अपीलींग असतात. आपल्याकडे ग्लॅमर इंडस्ट्रीतील महिला हे ड्रेसेस सर्रास वापरतात पण पाश्चात्य देशांमध्ये हे ड्रेसेस घालून वावरणाऱ्या इतर महिला मोठ्या संख्येनं दिसतात.

बाजारात बॉडीकॉन ड्रेसेसप्रमाणेच बॅण्डेज ड्रेसेसही उपलब्ध आहेत. बॉडीकॉन आणि बॅण्डेज ड्रेसमध्ये खूप फरक आहे तोही ध्यानात ठेवायला हवा.

बँण्डेज ड्रेसेस 

बॅण्डेज ड्रेसेस हे एखाद्या शेप वेअर प्रमाणे अत्यंत घट्ट असतात. त्वचेवर आणखी एक त्वचा चढविल्याप्रमाणे हे बँडेज ड्रेस असतात. मात्र बॉडीकॉन ड्रेसेस इतके घट्ट नसतात. ते केवळ शरीरावर सुंदर आकर्षकरीत्या परिधान करून शरीरसौष्ठव अधिक खुलवतात इतकेच. विशेषत: पॉलिस्टर ब्लेन्डच्या कपड्याचा वापर करून बॉडीकॉन ड्रेसेस बनवले जातात असं समजतं. याउलट बॅण्डेज ड्रेसेस मात्र रेयॉन, स्पॅन्डेक्स आणि नायलॉनच्या कपड्यांपासून बनवले जातात. रेड कार्पेट सेलिब्रिटीज बॅण्डेज ड्रेससलाच पसंती देतात असं दिसतं. कारण या बॅण्डेज ड्रेसेसमधून त्यांचं शरीरसौष्ठव अधिक खुलून दिसतं.

 

पण हे लक्षात ठेवाच.

बॉडीकॉन किंवा बॅण्डेज डे्रसेसची फॅशन करणार असाल तर या फॅशनमधले बारकावेही माहित असायला हवेत. ते माहित असल्याशिवाय ही फॅशन उठून दिसत नाही उलट ती फसण्याचीच शक्यता जास्त असते.

1) हा ड्रेस कॅरी करायचा असेल तर अत्यंत आत्वविश्वासपूर्ण देहबोली असायलाच हवी तेव्हाच हा ड्रेस तुमच्यावर सूट होईल.

2) या ड्रेसवर एखादाच अत्यंत सुंदरसा महागडा नेकपीस घाला. फार जास्त एक्सेसरीज घालण्याची गरजच नाही.

3) हाय हील्स किंवा स्टेलेटोजच घाला बाकी काहीही नको.

4)स्टोन्स वगैरे लावलेले क्लचेसच हातात हवेत, लांब पट्ट्याच्या पर्सेस अजीबातच नकोत.