शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

मोबाइलवर भरमसाठ अ‍ॅप्स भरुन ठेवलेत? - तुम्ही आऊटडेटेड आहात का?

By admin | Published: July 14, 2017 4:30 PM

जितके तुमच्या मोबाइलवर अ‍ॅप्स जास्त, तितके तुम्ही मागास ठरू शकता..

- चिन्मय लेलेएकेकाळी अ‍ॅप्सची केवढी गर्दी. नवीन अ‍ॅप आलं की कर डाऊनलोड, कुणाच्या फोनमध्ये कुठलं अ‍ॅप दिसलं की भर ते आपल्या मोबाइलमध्ये. आपल्याकडे अमूकतमूक अ‍ॅप आहे हे सांगण्याचीच इतकी चढाओढ की त्या अ‍ॅपमुळे फोनमधली जागा व्यापते, फोन स्लो होतात आणि त्याचा उपयोग पुन्हा शून्यच हे कुणी सांगितलं नाही. आता मात्र अ‍ॅपचा भर ओसरला तसा एकदम एक नवीन ट्रेण्ड आला आहे. आणि तो असं म्हणतो की, तुम्ही जर तुमच्या फोनमध्ये भरमसाठ अ‍ॅप्स भरुन ठेवत असाल तर समजा की, तुम्ही आऊटडेटेड आहात. कारण कनेक्टिव्हिटी फास्ट होत असल्याच्या या जगात आता अ‍ॅप्सची गरजच फारशी उरलेली नाही. आणि तरीही तुमच्या फोनमध्ये पुढी अ‍ॅप्सची गर्दी असेल तर ती काढा, कारण त्यांचा तुम्हाला काहीच उपयोग नाही, हे एकदा मान्य करुन टाकलेलं बरं!१) मेण्टल हेल्थ अ‍ॅप्सहे अ‍ॅप्स अनेकजण आवडीनं डाऊनलोड करुन घेतात. सुरुवातीला ते लावून ध्यान धारणा, श्वसनाचे प्रकार, श्वासावर एकचित्त वगैरे प्रयोग करतात. पुढे ते बंद पडतात. आणि अ‍ॅप्स मात्र पडून राहतात. हौशीनं डाऊनलोड केलेले असे मेण्टल हेल्थ अ‍ॅप्स काढा. एखादं, रोजच्या वापरातलं ठेवाायला हरकत नाही.२) अध्यात्म अ‍ॅप्सआपल्याला सगळ्यांनाच मन:शांती हवी असते. ती इझी हवी असते. म्हणून हे अ‍ॅप. श्लोक, अध्यात्म, भजनं, भाषणं देणारी. त्यांचाही उपयोग रोज नाही, पडून असतात अडगळीसारखी.

३) स्लीप अ‍ॅप्सहे जरा विअर्ड आहे पण जगात अनेकजण चांगली झोप यावी म्हणून रात्री झोपताना ऐकण्याचे स्लीप अ‍ॅप्स डाऊनलोड करुन ठेवतात, त्यांनी खरंच चांगली झोप लागते का, हा फार संशोधनाचा विषय आहे.४) स्किन केअरइतका जुनाट विषय. पण तरी स्किन केअर हा फार काळजीवाहू विषय. विशेषत: तरुण मुलामुलींसाठी. मग काय घरगुती उपाय ते सेलिब्रिटी उपाय सगळे अ‍ॅप गोळा होतात, स्किनचे प्रश्न आहेत तसेच राहतात.

 

५) फिटनेस अ‍ॅण्ड डाएटहे तर भयानक प्रकरण. फिटनेसचे इतके अ‍ॅप्स सध्या उपलब्ध आहेत. दर पाऊलाचा हिशेब हे अ‍ॅप्स ठेवतात. पण त्यानं कितीजणांना फिटनेस वाढीला उपयोग होतो, शोधायला हवं. तुम्हाला उपयोग होत नसेल तर किमान मोबाइलमधली जागा तरी मोकळी करा.