शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

​‘फर्स्ट इम्प्रेशन’ पाडायचेय? तर मग हे कराच...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2016 6:10 PM

इंग्रजीमध्ये ज्याला ‘फर्स्ट इम्प्रेशन’ म्हणतात ती पहिल्या भेटीत पडणारी छाप जर चांगली असेल तर नातं वाढतं.

पहिल्याच भेटीत तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वोत्तम पैलूंची छाप पाडण्याचे आठ मार्गनाते व्यावसायिक असो किंवा वैयक्तिक, दोन व्यक्तींमध्ये परस्पर संबंध प्रस्थापित होऊन ते पुढे नात्यामध्ये विकसित होण्यासाठी एकमेकांविषयी बनलेल्या मताची भूमिका खूप महत्त्वाची असते. इंग्रजीमध्ये ज्याला ‘फर्स्ट इम्प्रेशन’ म्हणतात ती पहिल्या भेटीत पडणारी छाप जर चांगली असेल तर नातं वाढतं. म्हणजे तुम्ही संभाव्य ग्राहकाला किंवा व्यावसायिक भागीदाराला भेटणार असाल, तुमचा प्रस्ताव त्याचा समोर मांडणार असाल तर अशा वेळी पुढीलपैकी कोणती गोष्ट तुमच्या व्यावसायिक नात्याचा पाया भक्कम करेल?* तुमचे कौशल्य, अनुभव आणि क्षमता किंवा* तुमची विश्वासहर्ताअनेकजण पहिल्या पर्यायाची निवड करतील. कारण मला जर समोरील व्यक्तीसोबत व्यावसा करायचा असेल तर त्याच्यामध्ये कौशल्य, अनुभव आणि क्षमता असलीच पाहिजे. त्यामुळे स्वाभाविकपणे पहिल्या पर्यायाच योग्य वाटतो.परंतु येथेच तर आपल्या मेंदूच्या कार्यप्रणालीमध्ये खरा ट्विस्ट येतो. पहिल्या भेटीत समोरील व्यक्ती तुमच्याबद्दल मत बनवताना तुमच्या टॅलेंट अथवा अनुभवाऐवजी तो एकाच प्रश्नाचे उत्तर शोधत असतो : मी या व्यक्तीवर विश्वास ठेवू शकतो का?म्हणजे पहिल्याच भेटीत तुमची विश्वासहर्ता दिसून आली नाही तर कदाचित समोरील व्यक्ती तुमच्यासोबत पुढे नातं ठेवू इच्छिणार नाही. नोकरीसाठी मुलाखतीला गेल्यावर तर ही बाब अधिक महत्त्वाची ठरते. सकारात्मक ‘ग्रेट फर्स्ट इम्प्रेशन’ पाडण्यासाठी तुम्ही या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.१. बोलण्यापेक्षा कान देऊन ऐकासमोरील व्यक्ती काय म्हणते याकडे जास्त लक्ष द्या. स्मितहास्य, चेहºयावरील हावभावांनी त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद द्या. आपले म्हणने कोणतरी लक्ष देऊन ऐकतोय, त्याला समजून घेतोय ही भावना पुढच्या व्यक्तीचा तुमच्यावरील विश्वास वाढवते.२. संपूर्ण लक्ष द्याकोणाशी बोलत असताना आपल्या फोनशी खेळणे, मध्येचे कॉम्प्युटर स्क्र ीनकडे पाहणे, आजुबाजूला पाहणे यासारख्या गोष्टी करण टाळले पाहिजे. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर त्याच्याकडे संपूर्ण लक्ष देता तेव्हा आपोआप त्याच्या मनात तुमची सकारात्मक छाप पडते.३. आदान-प्रदानाची वृत्तीसमोरच्या व्यक्तीपासून मला काय मिळणार, माझा काय फायदा असा केवळ स्वत:पुरता विचार ठेवून कोणाला भेटू नका. मी त्याला काय देऊ शकतो, माझ्यामुळे त्याला काय लाभ होऊ शकतो याचा विचार करा. एकमेकांच्या हिताचा विचार केला असता नातं आपोआप विकसित होते.४. तुर्रम खान वृत्ती सोडामी म्हणजे खूपच मोठा आणि मला भेटणारा कोणी गरजवंत अशी श्रेष्ठपणाची वृत्तीचा त्याग करणे परस्पर संबंध निर्माण होण्याची पहिली अट म्हणता येईल. समान पातळीवर येऊनच बोलणी झाली पाहिजे. दुसºयांना महत्त्व देणारा व्यक्ती प्रत्येकालाचा आपलासा वाटतो.५. प्रश्न विचारा पण जपूनसमोरच्याचे ऐकताना त्याला अधुनमधून प्रश्न विचारा. असे केल्याने तुमचे कुतुहल आणि उत्सुकता दिसून येते. पण असे करताना उगीच प्रश्नांचा भडिमार करू नका. मोजकेच पण नेमके प्रश्नर विचारा, जेणेकरून संभाषण खुंटण्याऐवजी ते अधिक प्रगल्भ होईल.६. शब्द जपून वापरातलवारीचा वार काळाच्या ओघात भरून निघतो परंतु शब्दांचा घाव अधिकाधिक खोल होत जातो. म्हणून बोलताना शब्द जपून वापरा. सकारात्मक शब्दांची निवड करा. एक दा उच्चारलेला शब्द परत घेता येत नाही. तुमच्या बोलण्यातून तुमची प्रवृत्ती निदर्शनास येत असते.७. निंदानालस्ती नकोचगॉसिप ऐकायला आपल्या सर्वांनाच आवडते. पण असे करणार्‍या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी आपणच दहा वेळा विचार करतो. म्हणून पहिल्याच भेटीत इतरांच्या चुका, त्यांच्यावर टीका किंवा त्यांच्या अपयशाचे पाढे वाचून दाखवू नका. असे करून तुम्ही तुमचीच विश्वासहर्ता गमावून बसता.८. नम्र भावनांचा स्पर्श येऊ द्यातटस्थ, कोरडे, रुक्ष संभाषणातून भावनिक नात्याचे बीज कसे रुजणार? समोरील व्यक्तीसोबत चांगला ‘रॅपो’अर्थातच जवळिकता निर्माण करण्यासाठी नम्रपणे स्वत:चे अनुभव शेअर करा. परंतु असे करताना स्वत:चेच रडगाणे गाऊ नका.