इतरांना मदत करण्याचे पाच मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:08 AM
आपल्या यशाबरोबरच इतरांनाही यश मिळून देण्यासाठी मदत करणे हे त्याचे कर्तव्य असते.
मानव हा समाजिक प्राणी आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाशी एकरूप होऊन त्याला जगावे लागते. आपल्या यशाबरोबरच इतरांनाही यश मिळून देण्यासाठी मदत करणे हे त्याचे कर्तव्य असते. आपण इतरांना कशाप्रकारे मदत करू शकतो याचे पाच मार्ग - १. मार्गदर्शकाची भूमिका'व्यस्त वेळापत्रकामुळे मला वेळ मिळत नाही' असे जर तुम्ही कारण सांगत असाल तर याला काही अर्थ नाही. तुमच्या अडचणीच्या वेळी कोणी तरी वेळ काढून तुम्हाला मदत केलीच असणार याची जाणीव ठेवा. तुमच्या अनुभवाचा उपयोग इतरांना मार्गदर्शन देऊन करा.२. खरं आणि स्पष्ट मतइतरांना साथ/मदत करणे म्हणजे त्यांच्या हो मध्ये नुसते हो मिळवणे नाही. जर ते कुठे चूकत असतील तर वेळीच त्यांना त्यांची चूक दाखवून द्या. तुमचे स्पष्ट आणि खरे मत सांगा. केवळ दुसर्यांचे मन ठेवण्यासाठी जे खरे आहे ते लपवू नका.'३. चर्चा कराचर्चेतून अनेक नवीन विचार बाहेर पडतात. विविध विषयांवर चर्चा केल्यामुळे अनेक पैलू समोर येतात. ज्यामुळे समोरच्याकडून तुम्हीदेखील दोन गोष्टी नवीन शिकू शकता. नवीन कल्पना, तुम्ही एखाद्या समस्येतून कसा मार्ग काढला याविषयी सांगितल्याने इतरांना प्रेरणा मिळते.४. शिका आणि शिकवाइतरांना मदतीमध्ये केवळ आर्थिक मदतच अपेक्षित नाही. ज्ञान ही अशी संपत्ती आहे जी दिल्याने वाढते. तुम्हाला माहीत असलेली गोष्ट, तुमचे ज्ञान इतरांना दिल्याने तुमच्याही ज्ञानात भर पडते. विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठी पैसा खर्च करावा लागत नाही.५. केवळ विचार नको,थेट मदत कराएकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ. तुम्हाला मदत करावीशी वाटते अशा पाच लोकांची यादी बनवा आणि त्यांना मदत करा. मदत करण्याचा केवळ विचार नका करू. थेट मदत करा. एकमेकांना मदत करण्यातच सर्वांचे भले आहे.