(Image Credit : Buzzsouk.com)
सध्या पावसाळा सुरू झाला असून पावसाच्या बरसणाऱ्या सरींपासून आपला बचाव करण्यासाठी आपण अनेक उपयोगी वस्तूंची शॉपिंग करण्यास सुरुवात केली असेलच. आपल्यापैकी प्रत्येकाच्याच मान्सून शॉपिंग लिस्टमध्ये छत्री, रेनकोट आणि फुटवेअर्स यांसारख्या वस्तूंचा प्रामुख्याने समावेश असतो. तुम्हीही या वस्तू अजून खरेदी केल्या नसतील आणि शॉपिंगला जाण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आम्ही काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही भर पावसाळ्यातही क्लासी आणि ट्रेन्डी दिसू शकता.
(Image Credit : Verywell Fit)
झिपर- नॉनझिपर रेनकोट
ऑफिसमध्ये जाणं असो किंवा मग घरातील एखाद्या आवश्यक कामासाठी बाहेर जाणं, पाऊस असेल तर रेनकोटचा आदार घ्यावाच लागतो. अशातच तुम्ही तुमच्या आवडीचा झिपर असलेला किंवा नॉनझिपर, प्रिंटेड किंवा प्लेन रेनकोट खरेदी करू शकता. बाजारामध्ये सध्या अनेक ट्रेन्डी आणि वेगवेगळ्या स्टाइल्सचे रेनकोट उपलब्ध आहेत.
रंगीबेरंगी डिझायनर छत्री
पावसापासून रक्षण करण्यासाठी हमखास वापरण्यात येणारी गोष्ट म्हणजे, छत्री. सध्या बाजारामध्ये अनेक ट्रेन्डी, स्टायलिश, हटके छत्र्या उपलब्ध आहेत. यामध्ये ग्राफिक्स छत्र्यांसोबतच बॉटल्स असणाऱ्या छत्र्यांना अनेकांची पसंती मिळताना दिसत आहे. तसेच डेझी फुल असणाऱ्या ब्राइट कलर्समध्ये मिळणाऱ्या स्टायलिश छत्र्याही फार सुंदर दिसतात.
वॉटरप्रूफ घड्याळं ठरतील फायदेशीर
जर तुम्हाला घड्याळ वापरण्याची आवड असेल आणि पावसाळ्यातही घड्याळ कॅरी करण्याचा विचार करत असाल तर बाजारातील वॉटरप्रूफ घड्याळं वापरू शकता. बाजारात विविध ब्रँड्सची वेगवेगळ्या किंमतीतील घड्याळं उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार एखादं घड्याळ सिलेक्ट करू शकता.
पावसाळ्यासाठी खास फुटवेअर्स
पावसाळ्यामध्ये फुटवेअर्स सिलेक्शनबाबत सर्वचजण विचारात असतात. अनेकांची अशी इच्छा असते की, पावसामध्ये फुवेअर्स खराब दिसू नयेत आणि ते ट्रेन्डीही असावेत. अशातच तुम्ही तुमच्या ड्रेससोबत मॅच होणाऱ्या फ्लिप-फ्लॉप, गमबूट्स, वेजेस आणि क्रॉक्स खरेदी करू शकता. यामुळे पावसाच्या पाण्यापासून पायांचं रक्षण होण्यासोबतच तुम्हाला ट्रेन्डी दिसण्यासाठीही मदत होईल.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.