फोर्ब्सच्या यादीत 45 भारतीयांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:06 AM
फोर्ब्ससने तयार केलेल्या यशस्वी स्वयंउद्योजकांच्या '३0 अंडर ३0' यादीत ४५ भारतीय व भारतीय वंशाच्या त...
फोर्ब्ससने तयार केलेल्या यशस्वी स्वयंउद्योजकांच्या '३0 अंडर ३0' यादीत ४५ भारतीय व भारतीय वंशाच्या तरुणांचा सामावेश करण्यात आला आहे. पारंपरिक चौकट मोडत स्वत:च्या हिंमतीवर व्यवसायाचे गणित खोटे ठरवत वयाच्या तीशीच्या आत यशस्वी उद्योगधंदे सुरू करणार्या तरुणांची ही यादी दरवर्षी प्रसिद्ध करण्यात येते. विविध क्षेत्रांमध्ये स्वत:चा वेगळा असा ठसा उमटविणार्या काही प्रमुख भारतीय स्वयंउद्योजकांची नावे पुढील प्रमाणे : 4 ग्राहक तंत्रज्ञान१. रितेश अग्रवाल (२२) : ओवायओ रुम्स, संस्थापक व सीइओ.२. गगन बियाणी व नीरज बेरी (२८) : स्प्रिग, सहसंस्थापक.३. करिश्मा शहरा (२७) : गुगल एक्सची सर्वात तरुण कर्मचारी4 अर्थ१. निला दास (२७) : सिटीग्रुप, सह उपाध्यक्ष.२. दिव्य नेट्टीमी (२९) : व्हायकिंग ग्लोबल इन्वेस्टर, गुंतवणूक विश्लेषक.३. विकास पटेल (२९) : मिलेनियम मॅनेजमेंट, वरिष्ठ विश्लेषक4 वस्तुनिर्माणशास्त्र (मॅन्युफॅक्चरिंग)१. समप्रीत भट्टचार्य (२८) : संशोधक, अंडरवॉटर ड्रोनची निर्मिती.२. सागर गोविल (२९) : सिमेट्रिक्स, सीईओ.4 कायदा आणि धोरण१. आशिष खंबत (२६) : फेडरल रिझर्व्ह बोर्ड, आर्थिक धोरण तज्ज्ञ.२. दीपायन घोष (२७) : खाजगी आणि सार्वजनिक धोरण तज्ज्ञ.३. अनिशा सिंग (२८) : युनायटेड सिख्स, पूर्व आंतरराष्ट्रीय धोरण विभाग प्रमुख.