शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

स्मार्टफोनला द्या हटके लूक...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2016 6:30 PM

सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन असून, तो जलदगतीने काम करावा आणि त्यात बदल घडून इतरांपेक्षा त्याचा हटके लूक दिसावा असे अनेकदा वाटते. मात्र, तंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती नसल्याने आपला स्मार्टफोन आहे तसाच दिसतो. बदलत्या तंत्रज्ञानानुसार आपला फोनचा लूकदेखील बदलायला हवा.

-Ravindra Moreसध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन असून, तो जलदगतीने काम करावा आणि त्यात बदल घडून इतरांपेक्षा त्याचा हटके लूक दिसावा असे अनेकदा वाटते. मात्र, तंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती नसल्याने आपला स्मार्टफोन आहे तसाच दिसतो. बदलत्या तंत्रज्ञानानुसार आपला फोनचा लूकदेखील बदलायला हवा. आजच्या सदरात आपल्या स्मार्टफोनला हटके लूक येण्यासाठी काय करावे याबाबत जाणून घेऊ या...स्मार्टफोनच्या तंत्रज्ञानात दिवसेंदिवस झटपट बदल होत असल्याने दर सहा महिन्यांनी नवा फोन घ्यावा अशी इच्छा उफाळून येते. मात्र प्रत्येकालाच नवीन फोन घेणे शक्य नसते. अशावेळी नवीन फोन घेण्यापेक्षा आपल्या फोनचा ‘इंटरफेस’ लॉँचरच्या साह्याने आपण फोनची नवलाई वाढवू शकतो. या अ‍ॅँड्रॉइड लॉँचरमुळे आपण आपल्या स्मार्टफोनमधील अ‍ॅप्स, इतर सुविधा आणि कॉलिंग आॅप्शनचे नियोजन करु शकता. तसेच त्याची कार्यक्षमतादेखील वाढवू शकता. शिवाय स्क्रीनची रंगसंगती, फॉँट, फोल्डरचे आयकॉन आदी बदलून फोनची आकर्षकता वाढवून हटके लूक देऊ शकता. या अँड्रॉइड लाँचरशी संबंधित अनेक अ‍ॅप्स गुगल प्लेवर पाहायला मिळतात. अशाच काही लाँचर्सची माहिती खाली दिली आहे. अपेक्स लाँचरस्मार्टफोन धारकांकडून सर्वात जास्त वापरले जाणारे ‘अ‍ॅपेक्स लॉँचर’ होय.  हे लाँचर सर्वात जुने असून थोडेफार लॉलीपॉप अँड्रॉइड आॅपरेटिंग सिस्टीमसारखे काम करते. या अ‍ॅपमध्ये तुम्ही एकाच वेळेला अनेक अ‍ॅप्सचे आयकॉन नियोजित करू शकता. या अ‍ॅपमध्ये अनेक थीम्स उपलब्ध असून हे अ‍ॅप कोणत्याही स्मार्टफोनमध्ये व्यवस्थित काम करू शकते. अ‍ॅक्शन लाँचर ३सर्वाेत्तम लॉँचर म्हणून याची गणना होते. यातील क्विकथीम या फीचरमध्ये आपला स्मार्टफोनच्या वॉलपेपरमधील एखादा रंग उचलून ‘सर्च बार’ त्याच्याशी एकरुप करता येतो. शिवाय  शटर्स आणि कव्हर्स असे वेगवेगळे फीचर्स देखील आहेत. ‘कव्हर’ नावाचे फीचर तुम्हाला एका फोल्डरमधून दुसºया फोल्डरमध्ये जाण्याचे काम सोपे आणि जलद करते. तसेच ‘शटर्स’ हे फीचर तुम्हाला एका अ‍ॅपचा उपयोग झाल्यावर लगेच दुसरे अ‍ॅप वापरण्याची प्रक्रिया सुलभ करते.होला लाँचरहे लॉँचर आपण सर्वात जास्त वापरत असेलेले अ‍ॅप्स स्क्रीनवर नियोजित करण्यास तसेच स्क्रीनवर दाखविण्यास मदत करते. विशेष म्हणजे स्मार्टफोनसाठीचे उपयोगी असे वैशिष्ट्ये यात असून, यामुळे स्मार्टफोन जलदगतीने काम करतो. तुम्ही तुमचे अ‍ॅप अगदी चटकन दाखवू अथवा लपवू शकता. या अ‍ॅपमध्ये थीम्स, आयकॉन्स, स्मार्टफोल्डर्स आणि हवामानाचे अंतर्गत अ‍ॅप यांचा समावेश आहे.एरो लाँचरमायक्रोसॉफ्टचे हे लॉँचर विण्डोज सारखे दिसत असून, त्याला खूपच प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हे अ‍ॅप तिसºया स्थानावर आहे. शॉर्टकट कीजबरोबरच तुमचे काहीच वेळापूर्वी डायल केलेले क्रमांक, जास्तवेळा वापरलेले अ‍ॅप्स, रिमायण्डर्स, तुमची कागदपत्रे तुमच्या स्क्रीनवर दिसतात. ज्या लोकांना विण्डोज वापराची जास्त सवय आहे ते या लाँचरला प्राधान्य देतील हे नक्की.लाँचर ८अ‍ॅँड्रॉइडशी काही संबंध नसलेले हे सर्वात वेगळे अ‍ॅप आहे. या लॉँचरमुळे आपल्या फोनचा अ‍ॅँड्रॉइड लूक विण्डोज सारखा दिसतो. तसेच या अ‍ॅपमुळे तुम्ही तुमच्या विजेट्सला विण्डोज प्रकारात बदलू शकता. यामुळे तुमचा फोन विण्डोजसारखा दिसेल पण तो असेल अँड्रॉइड. यामध्ये तुमच्या स्मार्टफोनचे काम सोपे करण्याच्या अनेक सुविधा आहेत.