फॅशन वर्ल्डमध्ये अनेक फॅशन स्टाइल्स ट्रेन्ड करत असतात. बॉलिवूड आणि फॅशन इंडस्ट्री हे जुळलेलं समीकरणच. अनेकदा फॅशन वर्ल्डमध्ये जितक्या लवकर एखादी फॅशन ट्रेन्डमध्ये येते तितक्या लवकरच ती फॅशन स्टाइल आउटऑफ ट्रेन्डही होते. पण एक फॅशन स्टाइल अशी आहे जी कधीच आउट ऑफ फॅशन गेली नाही. ती म्हणजेच साडी. अनेक वेगवेगळे साड्यांचे प्रकार फॅशन इंडस्ट्रीने बॉलिवूडला दिले आहेत. जाणून घेऊयात बॉलिवूडमधील अभिनेत्रींनी नेसलेल्या अशा साड्यांबाबत ज्यांमुळे नॉर्मल साडीला एक हटके लूक मिळण्यास मदत झाली.
1. श्रीदेवी - काटे नहीं कटते
'काटे नहीं कटते' या गाण्यामध्ये श्रीदेवी यांनी नेसलेली सिम्पल निळ्या रंगाची साडी त्यावेळी तरूणींच्या गळ्यातील ताईत बनली होती. त्यावेळी फॅशन वर्ल्डमध्ये शिफॉनची ही साडी ट्रेन्ड करत होती. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्यावर चित्रीत झालेल्या या गाण्यामध्ये श्रीदेवींनी घातलेली साडी आजही फॅशन वर्ल्डमध्ये चर्चेत असते.
2. माधुरी दीक्षित- धक धक करने लगा
या गाण्यानंतर माधुरीला एक वेगळी ओळख मिळाली होती. या गाण्याच्या बोलांवरून तिला 'धक धक गर्ल' असं नावही मिळालं. या गाण्यामधील माधुरीच्या ऑरेंज साडीने सर्वांच्या काळजाचा ठाव घेतला होता. कोनिकल ब्लाउजसोबत नेसलेली साडी माधुरीला हॉट आणि सेक्सी लूक देत होती.
3. माधुरी- दीदी तेरा देवर दीवाना
जिथे 'धक धक'मध्ये माधुरीला साडीमुळे सेक्सी लूक मिळाला तिथेच 'हम आपके है कौन' या चित्रपटामध्ये माधुरी निळ्या साडीमध्ये ट्रेडिशनल लूकमध्ये दिसून आली होती. सुंदर बॉर्डर, स्लीव्ड ब्लाउज आणि बांगड्यांसोबत माधुरीची ही साडी लग्न समारंभांमध्ये महिलांची पहिली आवड असते.
4. कटरीना कैफ- तेरी ओर
नेहमी वेस्टर्न आउटफिट आणि हटके अंदाजात दिसणारी कटरीना कैफ जेव्हा साडीमध्ये दिसली त्यावेळी अनेकांना तिच्या सौंदर्याची भूरळ पडली होती. पिंक बॉर्डरसोबत ब्लॅक साडीची ही स्टाइल अजूनही चर्चेत आहे.
5. प्रियांका चोप्रा - देसी गर्ल
प्रियांकाने दोस्ताना चित्रपटांतील देसी गर्ल गाण्यामध्ये नेसलेली साडी आपल्या बोल्ड लूकसाठी नेहमीच चर्चेत असते. प्रियांकाच्या या लूकनंतर मेटालिक साड्यांचा ट्रेन्ड वाढत गेला.
6. करीना कपूर - छम्मक छल्लो
'रा.वन' चित्रपटातील 'छम्मक छल्लो' गाण्यामध्ये करिना कपूरने घातलेल्या स्टाइलची क्रेझ अद्यापही दिसून येते. लग्न-समारंभांमध्ये या ब्लाउजच्या वेगवेगळ्या डिझाइन्स पाहायला मिळतात.
7. दीपिका पादुकोण- तितली
चेन्नई एक्सप्रेस चित्रपटातील दीपिकाचा लूक याच गोष्टीचा पुरावा आहे की, कितीही नवनवीन फॅशन्स आल्या तरीही ट्रेडिशनल साड्या आउट ऑफ फॅशन झाल्या नाहीत.