शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

​लग्नासाठी मुली पाहायला जाताय!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2016 4:12 PM

सध्या सर्वत्र लग्नाचा धुमधडाका सुरू झाला आहे. मुलगा किंवा मुलगी पाहण्याचा कार्यक्रमदेखील एक रोमांचक अनुभव असू शकतो. अरेंज मॅरेजमध्ये तर तरुणांसाठी एखाद्या मुलीला पाहण्यासाठी तिच्या घरी जाणे हे अविस्मरणीय ठरते.

-Ravindra Moreसध्या सर्वत्र लग्नाचा धुमधडाका सुरू झाला आहे. मुलगा किंवा मुलगी पाहण्याचा कार्यक्रमदेखील एक रोमांचक अनुभव असू शकतो. अरेंज मॅरेजमध्ये तर तरुणांसाठी एखाद्या मुलीला पाहण्यासाठी तिच्या घरी जाणे हे  अविस्मरणीय ठरते. बऱ्याचदा तिच्या घरच्यांना इंप्रेस करताना काही गोष्टी जाणवत नाहीत. पण, त्यांचा तुमच्या भविष्यावर परिणाम होत असतो. कारण लग्न हे आयुष्यभरासाठीचे बंध असून अशावेळी योग्य निर्णय घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. मुली पाहावयास जाताना काय काळजी घ्यावी याबाबत जाणून घेऊया...मुलीच्या घरी गेल्यानंतर तिच्या घरचे तुमच्याशी संवाद करताना कसे वागतात किंवा बोलतात यांचे नीट निरिक्षण केल्यास ते भविष्यात तुमच्यासोबत कसे वागतील हे आपणास समजू शकते. यासाठी खाली काही टिप्स दिलल्या आहेत. - बऱ्याचदा मुलींच्या घरच्यांकडून एखादा मुद्दा जबरदस्तीने पटविण्याचा प्रयत्न केला जातो. याबाबीकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीवर तिच्या घरातील संस्काराचा पगडा असतो. तिच्या किंवा त्याच्या वागण्या-बोलण्यातून घरातील संस्कार दिसत असतात. घरातील व्यक्तींच्या चांगल्या व वाईट सवयी देखील तुमच्यामध्ये नकळत उतरत असतात. जर तिच्या घरचे तुम्हाला एखाद्या गोष्टीबाबत जबरदस्ती करीत असतील तर या स्थळाबाबत पुढे जाण्याचा विचार थांबवा. किंवा जर तुम्ही त्यांना अजून एक संधी देण्याचा विचार करीत असाल तर त्या मुलीला याबाबत स्पष्टपणे तुमचे मत सांगा. - लग्नानंतर दोघांना आयुष्यभरासाठी एकत्र राहायचे आहे. यामुळे लग्नापूर्वी बरेच निर्णय दोघांनी मिळून घेणे आवश्यक असते. मात्र, बऱ्याचदा दोघांबाबतचे निर्णय घेताना ती किंवा तो जर सतत घरच्यांचे मत घेत असेल तर अशावेळी आपण सावध व्हायला हवे. कारण भविष्यात तुम्हा दोघांनाही सतत तिच्या घरच्यांचे ऐकावे लागू शकते. यासाठी तुमच्या पुढील आयुष्यातील काही खास निर्णय तुम्ही दोघेच मिळून घेणार आहोत हे स्पष्ट सांगा. यामुळे भविष्यात उद्भविणाऱ्या समस्यांना आळा बसेल. - आपण पहिल्यांदाच मुलीच्या घरी गेलो असेल तर पहिल्या भेटीत अस्वस्थता वाटणे सहाजिकच आहे, मात्र नंतरच्या भेटीतही तिच्या घरच्यांसोबत आपलेपणा वाटत नसेल तर त्याचा त्रास तुम्हाला या नातेसंबधात पुढे होऊ शकतो. यासाठी त्यांसोबत मोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न करा. अशाने त्यांचाही स्वभाव तुम्हाला कळेल आणि नंतरचे त्यांच्यासोबतचे संबंध जोपासताना त्रास होणार नाही. -  लग्नकार्यात किंवा तत्पूर्वी थोड्याफार प्रमाणात गमतीजमती ठिक आहे, मात्र, त्याचे रुपांतर थट्टेत  प्रमाणाबाहेर होत असेल आणि तिच्या घरचे तुमची सतत चेष्टा करीत असतील किंवा तिच्या घरची इतर मंडळी हसतखेळत तुमचा अपमान करीत असतील तर त्याबाबत तुम्ही तुमच्या भावी पत्नीसोबत बोला. तिचे याबाबत काय मत आहे यावरून तुम्ही तुमच्या भविष्यातील पुढील निर्णय घ्या. - सध्या घटस्पोटांचे प्रमाण वाढले असून या परिस्थितीला बरेच प्रसंग कारणीभूत आहेत. त्यात लग्नापूर्वी एकमेकांना जाणून न घेणे, विचारातील विसंगता, कौटुंबीक असमानता आदी बाबी पाहावयास मिळतात. या समस्यांवर घटस्पोट हा एकमेव पर्याय नसून त्यासाठी लग्नापूर्वी आणि लग्नानंतर दोघे कुटुंबांनी काळजी घेतल्यास घटस्पोटासारखा प्रसंग ओढवणार नाही.