हेअर कलरींगमध्ये गोल्डनची क्रेझ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2016 6:15 AM
चित्रपटातही अनेक सेलिब्रिटी या कलरींग करीत असतात, सध्या तरुण - तरुणींमध्ये केसांना गोल्डन करण्याची क्रेझ असल्याचे सर्वत्र पाहायला मिळते
आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे चेहºयाचा मेकअप, कपडे यावर विशेष लक्ष दिले जाते. यामध्ये भर घालण्यासाठी केसही सुंदर असणे आवश्यक आहेत. त्याकरिताच केस कलर केले जातात. त्यामुळे स्टाईलिस्टपणाही येतो व पांढरे केसही लपविले जातात. केसांना बरगंडी, ब्लॅक, ब्राऊन असे विविध प्रकारचे कलर केले जातात. त्यामुळे स्टाईलिस्ट लूक येऊन आपले व्यक्तिमत्व हे उठून दिसते. तसेच अलीकडे केस पांढरे होण्याची समस्या ही मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. तिच्यावर कलरींग हा एक उपाय आहे. त्यामुळे कलरींग करण्याकडे दिवसेंदिवस कल वाढत चालला आहे. त्यामध्ये चित्रपटातील स्टाईल दरवर्षी नवीन भर घालण्याचे काम करीत असते. प्रत्येक चित्रपटात हमखास वेगवेगळी केसांची स्टाईल आपल्याला बघायला मिळते. अन् तीच स्टाईल तरुणात येते. कलरींग हा प्रकार नवीन नाही. परंतु, दिवसेंदिवस त्यामध्ये सतत बदल होत आहे. तसेच अनेक वयस्करही पांढरे केस लपविण्यासाठी कलरींग करतात. त्यामुळे कलरींगचे फॅड हे सर्वामध्ये असल्याचे दिसून येते. हायलाईट हेअर कलरिंग : ही स्टाईल कॉलेज तरुण - तरुणीमध्ये सर्वाधिक आहे. यामुळे लूक खूप छान येतो. त्यामुळे महिला अलीकडे याकडे मोठ्या प्रमाणात वळल्या आहेत. तसेच .बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रीनेही विविध चित्रपटात ही स्टाईलमध्ये हमखास बघायला मिळतात. त्यामुळेच ही स्टाईल अधिक रुजली आहे. स्ट्रेटनिंग : यामध्ये केस हवे तसे आपल्याला करतात येतात. ज्यांचे कुरळे केस आहेत, ते सरळ सुद्धा यामुळे होतात. त्यामुळे आपला लूक हा स्ट्रेटनिंगमुळे इतरांपेक्षा हमखास उठवून दिसतो. कॉलेज तरुण- तरुणींमध्ये याचे प्रमाण हे अधिक आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात पर्सनॉलिटी ही खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात स्ट्रेटनिंगकडे वळत आहे. हेअर स्पा : केसांना चमक आणण्यासाठी हेअर स्पा हा खूप महत्त्वाचा आहे. यामुळे केस गळणे तसेच कोंडा होणेही थांबते. व्यक्तिमत्त्व उठून दिसण्यासाठी पुरुषासह महिलाही याकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. ज्यांना केसात कोंडा होण्याची समस्या आहे. त्यांच्यासाठी हेअर स्पा खूप उपयोगी आहे. यामुळे केसांची वाढही चांगले होते. स्पा केल्याने तणाव हलका झाल्यासारखे वाटते. सेलिब्रिटी बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री ऐश्वर्या रॉय ही नेहमी वेगवेगळ्या चित्रपटात हायलाईट हेअर कलरींग मध्ये असल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळे तरुणींना ही स्टाईल नेहमी भुरळ घालण्याचे काम करते. रामलीला चित्रपटामुळे तरुणींमध्ये लांब केसांची के्र झ आली होती. तर मुलांमध्ये सुद्धा रणवीर सिंगच्या स्मूथ आणि सिल्की फिझी हेअर स्टाईलचा प्रभाव दिसून आला होता. दिल धडकने दो या चित्रपटात केसांची वेगवेगळ्या प्रकारची स्टाईल पाहायला मिळते. अनिल कपूर हा नेहमी ट्रेडमार्क हेअर स्टाईल करीत आलेला आहे. त्यामुळे तरुणांमध्ये ही स्टाईल आजही मोठ्या प्रमाणात आहे. तसेच अलीकडे रिलीज झालेल्या सुल्तान या चित्रपटातील हेअर स्टाईल सुद्धा तरुणांमध्ये आली आहे. यावरुन हेअर स्टाईलवर पूर्वीपासून चित्रपटाचाच प्रभाव अधिक असल्याचे स्पष्ट होते. .