Good News : आता सॅमसंगची मोबाइल पेमेंट सुविधा !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2017 6:08 AM
कॅशलेस व्यवहाराचे सर्वत्र वारे वाहू लागल्याने आता सॅमसंगनेदेखील मोबाइल पेमेंट सेवा देण्याचे ठरविले आहे.
कॅशलेस व्यवहाराचे सर्वत्र वारे वाहू लागल्याने आता सॅमसंगनेदेखील मोबाइल पेमेंट सेवा देण्याचे ठरविले आहे. सॅमसंग इलेक्ट्रोनिक्सतर्फे ‘सॅमसंग पे’ अशी मोफत सेवा सुरू करण्यात आली असून या सेवेत क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड नोंदणी करून कॅशलेस व्यवहार करता येणार आहे.‘सॅमसंग पे’ अॅपच्या माध्यमातून कोणत्याही ठिकाणी व्यवहार करताना मोबाइल स्क्रीनवरील नोंदणी केलेले क्रेडीट किंवा डेबिट कार्ड स्वाईप करुन पैसे भरता येणे शक्य होणार आहे. सॅमसंग कंपनीचे गॅलेक्सी एस ७ एड्ज, गॅलेक्सी एस ७, गॅलेक्सी नोट ५, गॅलेक्सी एस ६ एड्ज प्लस, गॅलेक्सी ए ५ (२०१६), गॅलेक्सी ए ७ (२०१६), गॅलेक्सी ए ७ (२०१६), गॅलेक्सी ए ५ (२०१७) आणि गॅलेक्सी ए ७ (२०१७) या मोबाइलमध्ये सध्या सॅमसंग पे उपलब्ध आहे. जगातील महत्त्वाच्या देशात म्हणजे साऊथ कोरिया, चीन, स्पेन, सिंगापूर, आॅस्ट्रेलिया, रिको, ब्राझील, रशिया, थायलंड, मलेशिया याठिकाणी सॅमसंग पे अॅप उपलब्ध करण्यात आले आहे.