कधी कोणती फॅशन ट्रेन्डमध्ये येईल हे सांगता येत नाही. त्यातच बॉलिवूड सेलिब्रिटी आणि फॅशन वर्ल्ड हे जुळलेलं समीकरण. एखादी फॅशन ट्रेन्डमध्ये आहे आणि बॉलिवूडकरांनी ती डोक्यावर घेतली नाही म्हणजे अशक्यच. अशातच केसांची एक फॅशन ट्रेन्डमध्ये आहे. बॉलिवूडकरांसह हॉलिवूडकरांनाही या फॅशनचं वेड लागलं आहे. सध्या सेलिब्रिटींमध्ये केसांना कलर करण्याच्या ट्रेन्डची चलती आहे. आता तुम्ही विचार करल की, यामध्ये काय नवीन? अनेक सेलिब्रिटी तर वेळोवेळी केसांवर वेगवेगळे रंग ट्राय करताना दिसत असतात. पण सध्या प्लॅटिनम रंग ट्रेन्डमध्ये आहे. अनेक सेलिब्रिटींना या रंगाने भूरळ घातली असून आपला लूक वेगळा करण्यासाठी सेलिब्रिटी या रंगाचा आधार घेत आहेत.
आपल्या हॉट फोटोंमुळे नेहमी चर्चेत राहणारी लीझा हेडन यावेळी आपल्या लूकमुळे चर्चेत आली आहे. दरम्यान लीझाने आपले सगळे केस कलर केले असून ती सध्या प्लॅटिनम रंगाच्या केसांमध्ये दिसून येत आहे. लीझाचा हा लूक अनेकांना आवडत आहे तर अनेक चाहते तिच्या य लूकवर टिका करत आहेत. तर काही लोकं लीझाची गेम्स ऑफ थ्रोनमधील डेनेरेससोबत तुलना करत आहेत. लीझाच्या व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे लीझाला किम कार्दाशिया सुद्धा म्हटलं जात आहे. तर काही लोकांना लीझाचा हा लूक लेडी गागाप्रमाणे दिसत आहे.
लीझा हेडनप्रमाणे दिग्दर्शक करण जोहरनेही आपल्या केसांना कलर केला आहे. अनेक लोकांना हा ट्रेन्ड आवडलेला नाही पण तरिदेखील या ट्रेन्डची चलती पाहायला मिळते. याला प्लॅटिनम आणि सिल्वर हेअर असंही म्हटलं जातं. जर यासोबत तुम्ही मॅचिंग ड्रेसही घातलात तर यामुळे एक हटके लूक मिळण्यास मदत होईल.
हॉलिवूड सेलिब्रिटींनाही ग्रे हेअरसोबतच प्लॅटिनम हेअरच्या ट्रेन्डनेही भूरळ घातली आहे. जस्टिन बीबर, कायली जेनर यांसारखे हॉलिवूड सेलिब्रिटी या ट्रेन्डमध्ये सामिल झाले आहेत.
जर तुम्ही हा रंग वेवी आणि लांब केसांवर ट्राय केलात तर तुम्हाला स्टायलिश लूक मिळण्यास मदत होईल. फक्त महिलांमध्येच नाही तर पुरूषांमध्येही हा ट्रेन्ड व्हायरल होत आहे.