स्वयंपाक घरात पतीची मदत आनंददायी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2016 4:01 AM
अलीकडे पुरुषही स्वयंपाक बनविण्यासाठी रुची घेत आहे.
तसे पाहीले तर शेफचे काम हे पुरुषच करतात. परंतु, स्वयंपाक हे महिलांचेच काम समजले जाते. महिलांना का आवडतो आपल्या पतीने तयार केलेला स्वयंपाक त्याची काही ही कारणे.प्रेम वाढते : दररोजच्या कामातून सुट देऊन आपल्याला आराम मिळावा. असे प्रत्येकलाच वाटते, परंतु, पत्नीला स्वयंपाकाचे काम घरात सुटतच नाही. तिला जर तिच्या पतीने स्वयंपाकासाठभ मदत के ली तर त्यांच्यातले प्रेम हे अधिकच वाढते.सोबत वेळ घालविणे : स्वयंपाकाच्या निमित्ताने दोघांना सोबत वेळ घालविता येतो. आजच्या धावपळीच्या युगात दुसºयासोबत बसण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही. यामुळे पती व पत्नीला यानिमित्ताने सोबत वेळ घालविता येतो. पती मदत करीत असल्याने महिलांचा आनंद अधिकच द्विगणीत होतो. शांतता राहते : घरातले कामे ही न संपणारी असतात. वेळेची मर्यादा सर्वांनाच असते. पतीने जर पत्नीला स्वयंपाक बनविण्यासाठी घरात मदत केली तर महिलांना कामे करणे सोपे होते. या मदतीमुळे घरातील कामे दोघांमध्ये वाटली जाऊन, घरामध्ये नेहमी शांतता राहते.मदतीची भावना : घरामध्ये एक दुसºयासोबत संवाद हा महत्वाचा आहे. त्यामुळे त्यांचे संबंध हे नेहमी चांगले राहतात. संवादामुळे घरात सहसा कोणताही वाद होत नाही. एखाद्यावेळेला पत्नीला बाहेर जावे लागले व स्वयंपाक बनविण्यासाठी वेळ नाही. अशावेळेला पतीने स्वयंपाक करावयाला हवा. तसेच घरात नेहमी एकमेकांना मदत करण्याची भावना असावी.स्वयंपाक येणे आवश्यक : कोणत्याही घरातील महिला ही कधी ना कधी आजारी पडल्याशिवाय राहत नाही. अशावेळेला काय करणार ? जेवण हे सर्वांसाठी गरजेचे आहे. प्रत्येकवेळी आपण बाहेरचे जेवण घेऊ शकत नाही. अशावेळेला घरातील कुणालातरी स्वयंपाक तयार करावाच लागतो. तो स्वयंपाक पत्नीला खूप आवडतो.कंटाळा घालण्यासाठी : स्वयंपाक बनविल्यामुळे सुद्धा रिलॅक्स होता येते. दररोजच्या आॅफिस कामामुळे पती खूप कंटाळवाणा झालेला असेल, अशावेळेला पतीने स्वयंपाक बनविला तर निश्चीतच त्याचा कंटाळा गेल्याशिवाय राहत नाही. स्वयंपाक ही दररोजच्या जीवनातील आवश्यक गरज आहे. ती केवळ महिलांचीच जबाबदारी नाही.