आपला मोबाइल हरवला किंवा चोरीला गेलाय?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2017 8:50 AM
बऱ्याचदा अनावधानाने आपला मोबाइल कुठे तरी विसरतो किंवा बस, ट्रेन किंवा मार्केटमध्ये चोरीला जातो. कुणाच्या हाती लागला तर मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, आता मोबाइल चोरीला गेला तरी भीती बाळगण्याची गरज नाही...
बऱ्याचदा अनावधानाने आपला मोबाइल कुठे तरी विसरतो किंवा बस, ट्रेन किंवा मार्केटमध्ये चोरीला जातो. आपला मोबाइल म्हणजे स्मार्टफोन आपल्यासाठी एक मिनी कंप्युटरच असल्याने अतिशय महत्त्वाचा डाटा आपण त्यात सेव्ह केला असतो. जर तो मोबाइल चोरीला गेला किंवा हरविला आणि कुणाच्या हाती लागला तर मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, आता मोबाइल चोरीला गेला तरी भीती बाळगण्याची गरज नाही, कारण कुणी मोबाईल चोरला, तर तुम्हाला त्याचं लोकेशनही मिळू शकतं. तसंच तुम्ही त्या मोबाइलमधला डेटाही डिलीट करू शकता.काय कराल?* आज जवळपास सर्व मोबाइलमध्ये Android Divice Manager असते. जर आपल्या मोबाइलमध्ये हे अॅप नसल्यास गुगलच्या प्ले स्टोरमधून डाऊनलोड करा.* डाऊनलोड झाल्यानंतर अॅप सुरू करा आणि Accept वर क्लिक करा.* Accept केल्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये हे अॅप अॅक्टिवेट होतं.* तुमचा मोबाइल शोधण्यासाठी तुमच्या कॉम्प्युटर किंवा टॅबलेटवर तुमचा जो इमेल आयडी गुगल प्लेस्टोरवर आहे, त्या मेल आयडीतून लॉग इन करा* त्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला वरच्या दिशेनं काही अॅप आयकॉन दिसेल. तिथं दिसणाऱ्या ‘प्ले’ या आयकॉनवर क्लिक करा.* प्ले स्टोर सुरू झाल्यावर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर उजव्या बाजूला वरच्या दिशेनं सेटिंग हा आयकॉन दिसेल. तिथे असणाऱ्या Android Divice Manager वर क्लिक करा.Android Divice Manager सुरू झाल्यावर तुमच्या हरवलेल्या मोबाइलचं मॉडेल नंबर सिलेक्ट करा.* आता तुमच्या मोबाइलमध्ये आलेल्या मॅपमध्ये मोबाईलचं लोकेशन दाखवलं जाईल. * मोबाइलच्या नावासह तुम्हाला आणखी तीन पर्याय दिसतील.* RING: यावर क्लिक केल्यास तुमच्या मोबाइलची पाच मिनिटापर्यंत रिंगटोन वाजत राहील.* LOCK: यावर क्लिक केल्यास एखादा नवीन पासवर्ड टाकून तुम्ही तुमचा मोबाइल लॉक करू शकता. याशिवाय तुम्ही एकादा टेक्स्ट मेसेजही लिहू शकता. जो मोबाइलच्या लॉक स्क्रीनवर येणार. तुम्ही तुमचा दुसरा नंबरही यात सेव्ह करू शकता. ज्याच्या कॉल आयकॉनवर जाऊन तुम्ही ज्याला मोबाइल मिळाला त्याच्याशी बोलू देखील शकता. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या नंबरवरून कॉल करत आहात तो नंबर स्क्रीनवर दिसणार नाही.* ERASE: यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या मोबाइलमधला संपूर्ण डेटा डिलीट करू शकता.