लपवा-छपवीही फायद्याची
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2016 2:58 AM
खोटे बोलणे ही चांगली सवय नाही.
परंतु, ज्या खोट्या बोलण्यामुळे कुणाचे नुकसान न होता उलट फायदा होत असेल तर खोटे बोललेले काहीच वाईट नाही. कार्यालयात किंवा नवीन जॉबच्या ठिकाणी खोटे बोलण्यामुळे काय - काय फायदा होऊ शकतो त्यांची ही माहिती. जबाबदारी स्वीकारताना : कार्यालयात आपल्यावर एक मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. परंतु, आपण त्याकरिता तयार नाही. अशावेळेला बॉससोबत मी हे सर्व सांभाळून घेतो असे खोटे बोलावे. त्यानंतर मी हे काम कसे करणार आहे यासंबंधीही चर्चा करावी. यामुळे आपल्या सिनीअर्सचा आपल्यावरील विश्वासही वाढेल व स्वत: आपल्यालाही आत्मविश्वास आल्याने, ते कामही आपल्याकडून होऊ शकते. मुलाखत देताना : नोकरीच्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर संबंधीतांनी मागच्या बॉसच्या संदर्भात वाईट गोष्टी विचारल्या. तर त्या ठिकाणी पूर्णपणे खोटे बोलून, त्यांना सांगायचे कि, माझे बॉस खूप चांगले होते. त्यांच्यामुळे विविध गोष्टी मला शिकायला मिळाल्या . कारण की, कुणाविषयी नकारात्मक सांगून आपल्याला काहीही मिळत नाही. उलट मागील ब्रासमुळे खूप काही शिकता आले. येथेही नवीन गोष्टी मला शिकायला आवडतील. अशाप्रकारच्या खोट्या बोलण्यामुळे तुमचे इप्रेशन पडल्याशिवाय राहणार नाही. पगाराबाबत सांगताना : कोणत्याही नवीन कंपनीत तुम्हाला पगाराची अपेक्षा विचारली तर ती पूर्वीपेक्षा खोटी का असेना पण जादा सांगावी. अशा खोट्या बोलण्यामुळे कोणतेही वाईट होत नाही. कारण की, असे खोटे बोलणे हे आवश्यक असून,त्यामुळे तुम्हाला जादा पगार मिळू शकतो. यामुळे तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढतो. तुम्हाला मागीतलेला पगार ते जरी देऊ शकणार नाही. परंतु, आपण त्यांना मला किती पगार देऊ शकता हे विचारु शकतो.