घर शिफ्ट करताय?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:18 AM
घर बदलायचे म्हटल्यावर डोळयांसमोर येतो तो घरात होणारा पसारा, सामानाची जमवाजमव.
घर बदलायचे म्हटल्यावर डोळयांसमोर येतो तो घरात होणारा पसारा, सामानाची जमवाजमव. त्यामुळे घर शिफ्टिंग म्हणजे खूपच तापदायक गोष्ट वाटते. पण याच गोष्टी थोड्याशा स्किलफुली केल्या तर त्या सोप्या होतात. व्यवस्थापन हा त्यात खूप महत्त्वाचा भाग ठरू शकतो. त्याशिवायही अशा काही वस्तू नवीन घरात न्याव्याच लागतात ज्या आपल्याला रोजच्या आयुष्यात कामी पडत स्वयंपाकातील काही भांडी : धार लावलेला चाकू, लाकडी चमचे आणि कॅन ओपनर या स्वयंपाकघरात केव्हाही लागणार्या आवश्यक वस्तू आहेत. नवीन घरात त्याची मदत घ्यावीच लागते. त्यामुळे शिफ्टिंग करताना याकडे विशेष लक्ष हवे.हत्यारे : नवीन घरात आणलेल्या वस्तू लावण्यासाठी खिळे, हातोडी, टेप, पाने यांची गरज असते. या वस्तूंचा योग्य वापरही तुम्हाला करता आला पाहिजे.रोपटे : घरात हिरवळ असली की घरात प्रसन्नता राहते. वातावरण आनंददायी होते. त्यामुळे कुंडीत लावलेले रोपटे घेऊन त्यासाठी घरात विशेष जागा बनवावी.पुस्तके : पुस्तके ही घरातील वैभव असतात. त्यामुळे जर तुम्हाला घरात पुस्तके ठेवण्याचा छंद आहे तर जरूर नव्या घरात तुम्ही पुस्तके ही घेऊन जायलाच हवीत.बेकिंग सोडा व विनेगर : किरायाच्या घरात अनेकदा भिंत, फरशी यावर डाग पडलेले असतात.