पॉर्नस्टारचा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2016 8:27 AM
एकेकाळी पॉर्न स्टार म्हणून हिणवल्या गेलेली ब्रिटनमधील ७० च्या दशकातील दिवंगत अभिनेत्री मॅरी मिलिंगटनचा ब्रिटनमधील सर्वोच्च सन्मानापैकी एक असलेल्या ‘हॅरिटेज ब्लू प्लॅक’ने मंगळवारी गौरव करण्यात आला.
एकेकाळी पॉर्न स्टार म्हणून हिणवल्या गेलेली ब्रिटनमधील ७० च्या दशकातील दिवंगत अभिनेत्री मॅरी मिलिंगटनचा ब्रिटनमधील सर्वोच्च सन्मानापैकी एक असलेल्या ‘हॅरिटेज ब्लू प्लॅक’ने मंगळवारी गौरव करण्यात आला. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कुठल्याही क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाºया व्यक्तीला ब्रिटनमध्ये हा पुरस्कार दिला जातो. मॅरी मिलिंगटला तो कला क्षेत्रासाठी दिला गेला. ‘हॅरिटेज ब्लू प्लेक’ हा एक आकाशी रंगाचा साइन बोर्ड असतो. त्यावर त्या व्यक्तीच्या कार्याचा गौरव केला जातो. तिच्या मृत्यूनंतर तिचा हा गौरव झाला आहे. मॅरी मिलिंगट ही ७० च्या दशकातील ब्रिटनमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक पॉर्न चित्रपटात काम केले आहे. त्यामुळे सेक्स क्विन अशीच तिची ओळख आहे. १९७७ मध्ये प्रदर्शित झालेला तिचा एक चित्रपट सलग चार वर्षे लंडनच्या सिनेमागृहात चालला. इंग्लडमध्ये हा विक्र म अजूनही अबाधित आहे. १९७५ मध्ये ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान हारोल्ड विल्सन यांच्यासोबत ती लिव्ह इन रिलेशनशीनमध्ये होती. ब्रिटनच्या पंतप्रधानाचे शासकीय निवासस्थान असलेल्या १० डाउनिंग स्ट्रीटमध्ये ते राहत असत. १० डाउनिंग स्ट्रीटमध्ये ती एक वेळा पंतप्रधानाच्या गार्डसमोरच टॉपलेस झाली होती. पत्रकारांना तिने ही पोज दिली होती. ब्रिटिश न्यूज पेपर द सननुसार तिने वयाच्या १५ व्या वर्षीच आपले कौमार्य गमावले. पुढे बॉब मॅक्सेडसोबत तिचे लग्न झाले. सुरु वातीला ती मॉडेलिंग क्षेत्रात आली. न्यूड फोटो शूट करता करता ती पॉर्न इंडस्ट्रीत गेली. १९७९ मध्ये पती बॉबसोबत तिने काडीमोड घेतला.