सिमेंटच्या पाईपमध्ये हॉटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2016 1:15 PM
सिमेंटच्या पाईपमध्ये मेक्सिको या देशात ‘द ट्युबो’ हे जगाच्या पाठीवरील एक आगळेवेगळे हॉटेल आहे.
सिमेंटचे रिकामे पडलेले पाईप म्हणजे आपल्याकडे ते उपद्रवी प्राण्याचा अड्डा असतो. त्या पाईपचा वापर करता येईल, असा आपल्याकडे कु णी सहजासहजी विचारही करीत नाही. ज्यांना निवारा नाही, असे लोक या पाईपममध्ये रात्रीला आसरा घेताना आपल्याला दिसतात; परंतु मेक्सिको या देशात ‘द ट्युबो’ हे जगाच्या पाठीवरील एक आगळेवेगळे हॉटेल आहे. हजारो रुपये खर्च करून अनेकजण तेथे राहतात. सिमेंटच्या पाईपचे हे हॉटेल आहे. हे सिमेंटच्या पाईपचे हॉटेल असेल, अशी कुणी कल्पनाही करूशकत नाही, असे त्याचे डेकोरेशन करण्यात आले आहे. दोन माणसे झोपू शकतील असा त्यामध्ये बेड आहे. या पाईपमधून ग्राहकाला निसर्गाचा आनंदही घेता येईल, याचीही काळजी घेण्यात आली आहे. टाकाऊपासून टिकाऊ ही कल्पना वापरून हे हॉटेल तयार करणार आले आहे. पर्यटक याठिकाणी मोठ्या संख्येने जातात. पडून असलेल्या पाईपपासून हे हॉटेल थाटण्यात आले आहे. गत ५ ते ६ वर्षांपासून हे आगळेवेगळे हॉटेल सुरू आहे.