केस. ही समस्या केवढी मोठी. केस सरळ, सिल्की, मऊ, चमकदार असणं हे काही सगळ्यांचंच भाग्य नसतं. आणि कितीही प्रयत्न केले तरी असे केस सगळ्यानांच मिळत नाहीत. मात्र त्यासाठी महागडे श्ॉम्पू, स्पा, कंडिशनर असं सगळं वापरलं जातंच. मात्र एवढं करुनही आपण केसांना कंडिशनर नीट लावला नाही तर केस धुतल्यानंतर राठ, कोरडेच दिसतात. त्यासाठी कंडिशनर योग्यप्रकारे लावलं पाहिजे.
1) कंडिशनर कधीही घाईघाईत लावू नये. वेळ असेल तेव्हाच कंडिशनर लावणं योग्य.2) केस न धुता, ओले करुन नुस्तं वरवर कंडिशनर अनेकजण लावतात. त्याचा काहीही उपयोग होत नाही.3) केस धुतांना श्ॉम्पू पुरणं धुतला गेला आहे, याची काळजी घेऊनच कंडिशनर लावणं उत्तम.4) कंडिशनर जेल हातावर घेऊन ते तळव्यांवर नीट चोळून केसांना लावावं. हळूवार मुळांपासून टोकांर्पयत. स्काल्पला कंडिशनर लावू नये. फक्त केसांना लावावं.5) कंडिशनर सेट होवू द्यावं. तेच अनेकजण करत नाहीत. केसांना लावलं लगेच धुतलं तर लावण्याचा काहीही उपयोग नाही. त्यापेक्षा 2 ते 5 मिनिट एवढा वेळ ते केसांवर ठेवावं. मग धुवावं.6) गार पाण्यानंच कंडिशनर नीट धुवावं. गरम पाणी सहसा वापरू नये.7) केस हातांना मऊ, हलके, सुळसुळीत लागले तर समजावं कंडिशनर उत्तम झालं.