चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यासाठी ज्याप्रमाणे आपण मेकअपचा आधार घेतो त्याचप्रमाणे हातांच सौंदर्य वाढविण्यासाठी नेलपेंट किंवा नेलपॉलिशचा वापर करण्यात येतो. नखांचं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक मुली नेलपॉलिशचा वापर करतात. पण अनेकदा कोणता शेड आपल्या नखांवर शोभून दिसेल? किंवा आपल्या स्किन टोनला कोणती नेलपेंट सूट होईल? याबाबत गोंधळ उडतो. अशातच चुकीचा शेड निवडल्यामुळे सुंदर दिसण्याऐवजी नखांचा लूक बिघडतो. त्यामुळे नेलपेंट खरेदी करताना विशेष काळजी घेणं गरजेचं असतं.
स्किन टोन
नेलपेंट खरेदी करताना तुमच्या हातांचा स्किन टोन कसा आहे, हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. उदाहरणार्थ फेयर स्किनसाठी जास्त लाइट कलरची नेलपेंट सूट करते. तर सावळ्या स्किन टोनसाठी न्यूड शेड, ऑरेंज-रेड, पिंक, लाइट ब्ल्यू यांसारखे कलर सूट करतात. जर तुमचा स्किन टोन डार्क असेल तर त्यावर ब्राइट कलर फार सुंदर दिसतात.
मेकअप
जर तुम्ही एखाद्या समारंभासाठी किंवा इव्हेंटसाठी नेलपेंट खरेदी करत असाल तर नेलपेंट निवडताना आपल्या ड्रेसचा कलर लक्षात घ्या. तसेच मेकअपमध्ये यूज करणाऱ्या कलर टोनही लक्षात घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही बोल्ड मेकअप करणार असाल तर नखांसाठीही बोल्ड कलर्स निवडू शकता.
सीझन
अनेक महिला सीझननुसार नेलपेंट सिलेक्ट करतात. विंटरमध्ये डार्क कलरची नेलपेंट वापरतात. कारण विंटरमध्ये कपडेही त्याच कलरचे वापरले जातात. तर उन्हाळ्यामध्ये ब्राइट कलर्स वापरण्यात येतात.
ओकेजन
तुम्ही एखाद्या ओकेजनचा भाग बनणार असाल तर नेल पॉलिश निवडताना विशेष काळजी घ्या. एखाद्या दुखःद प्रसंगावेळी ब्राइट कलरची नेलपेंट लावणं चांगलं दिसत नाही. तसेच ब्लॅक कलरची नेलपेंटही प्रत्येक इव्हेंटसाठी सूट होत नाही. त्यामुळे ओकेजन लक्षात घेऊन नेलपेंटची निवड करा.