शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

​‘भीम’ अ‍ॅप कसे वापराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2017 4:17 PM

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ट्रान्जेक्शनसाठी ‘भीम’ नावाचे एक नवे अ‍ॅप लॉन्च केले. ‘भारत इंटरफेस फॉर मनी अ‍ॅप्लिकेशन’ किंवा BHIM (भीम) हे अ‍ॅप लॉन्च करण्यामागे कॅशलेश ट्रान्जेक्शनला प्रोत्साहित करणे हे उद्दिष्ट आहे. आजच्या सदरात भीम अ‍ॅप कसे वापरावे याबाबत जाणून घेऊया...

-Ravindra Moreदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ट्रान्जेक्शनसाठी ‘भीम’ नावाचे एक नवे अ‍ॅप लॉन्च केले. ‘भारत इंटरफेस फॉर मनी अ‍ॅप्लिकेशन’ किंवा BHIM (भीम) हे अ‍ॅप लॉन्च करण्यामागे कॅशलेश ट्रान्जेक्शनला प्रोत्साहित करणे हे उद्दिष्ट आहे. आजच्या सदरात भीम अ‍ॅप कसे वापरावे याबाबत जाणून घेऊया...* भीम अ‍ॅप वापरण्यासाठी ‘युपीआय’ अकाऊंट असणे गरजेचे आहे. भीम अ‍ॅपद्वारे ट्रान्जेक्शन करण्यासाठी पैसे पाठविणाऱ्याआणि पैसे घेणाऱ्यादोन्ही व्यक्तींचे अशा बॅँकेत अकाऊंट असणे गरजेचे आहे जे ‘युपीआय’शी संलग्नित असेल. सोबतच आपला मोबाइल नंबर संबंधित बॅँकेत रजिस्टरदेखील असणे आवश्यक आहे. * भीम अ‍ॅपला प्ले स्टोरमधून डाऊनलोड करासर्वप्रथम या अ‍ॅपला प्ले स्टोरमधून डाऊनलोड करुन आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा. हे अ‍ॅप २ एमबी पेक्षाही कमी आहे.* आपल्या आवडीची भाषा निवडात्यानंतर आपण अ‍ॅपमध्ये आपल्या आवडीची भाषा निवडा. यात सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषेचा पर्याय मिळेल, मात्र सरकार लवकरच अन्य भाषांचाही समावेश करणार आहे.* ‘एसएमएस’ रिक्वेस्टला ओके करात्यानंतर भीम अ‍ॅप आपणास ‘एसएमएस’ वाचणे आणि पाठविण्याची रिक्वेस्ट ओके करण्यास सूचित करेल. या रिक्वेस्टला ओके करणे खूप आवश्यक आहे, कारण या नंबरच्या उपयोगानेच बॅँकेसंबंधी सर्व माहिती आपणापर्यंत पोहोचेल.* मोबाइल नंबरला व्हेरीफाय कराजर आपण ड्युअल सीमचा फोन वापरत असाल तर आपणास विचारले जाईल की, आपण कोणता नंबर बॅँकेत रजिस्टर केला आहे. जो नंबर रजिस्टर केला असेल त्याचीच निवड करा.* चार अंकांचा पासवर्ड बनवायानंतर आपण चार अंकांचा पासवर्ड बनवा. याच पासवर्डच्या माध्यमाने आपण या अ‍ॅपमध्ये लॉगिन करु शकाल. हा पासवर्ड कुणालाच न सांगता गुपित ठेवा आणि विसरुही नका, कारण पासवर्ड जर विसरला तर अकाऊंट लॉगिन नाही करु शकणार. * आपली बॅँक निवडायानंतर आपणास ३० बॅँकाची यादी दिसेल, ज्यामधून आपणास आपल्या बॅँकेची निवड करायचीय. जर आपले एकापेक्षा जास्त बॅँकेत अकाऊंंट आहेत आणि त्याही ‘युपीआय’शी संलग्नित असतील तर आपण फक्त एकाच बॅँकेची निवड करू शकता. जर आपण कधी दुसºया बॅँकेला लिंक करु इच्छिता तर अगोदरच्या बॅँकेला हटवावे लागेल. * अकाऊंट आणि युपीआय पिन बनवासर्वप्रथम भीम अ‍ॅपच्या मेन मेनूमध्ये जा. त्यानंतर बॅँक अकाऊंटला सिलेक्ट करा. नंतर सेट युपीआय पिन आॅप्शनला सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या एटीएम किंवा डेबिट कार्डचे शेवटचे सहा अंक टाका. तसेच कार्डची एक्सपायरी डेटदेखील टाकावी. यानंतर आपणास एक ‘ओटीपी’ मिळेल. त्याला अ‍ॅपमध्ये डायल केल्यानंतर युपीआय पिन बनवू शकता. * आता पैसे सहज पाठवू शकता. आता आपण कोणालाही आपल्या फोन नंबर टाकून पैसे पाठवू शकता. तसेच या अ‍ॅपमध्ये ‘क्यूआर’ कोड स्कॅन करून पैसे पाठविण्याची सुविधाही आहे. या अ‍ॅपद्वारे पैसे पाठविण्यासाठी आपल्याला यूजरचा अकाऊंट नंबर किंवा ‘आयएफएससी’ कोड वगैरची गरज नाही. आपल्याजवळ फक्त समोरच्या व्यक्तीचा फोन नंबर असणे गरजेचे आहे. मात्र ज्याला पैसे पाठवायचे आहेत, त्याचेही युपीआय अकाउंट असणे गरजेचे आहे. *कोणत्या बॅँका भीम अ‍ॅपला सपोर्ट करतात?अलाहाबाद बॅँक, आंध्रा बॅँक, अ‍ॅक्सिस बॅँक, बॅँक आॅफ बडोदा, बँक आॅफ इंडिया, बॅँक आॅफ महाराष्ट्र, कॅनरा बॅँक, कॅथोलिक सीरियन बॅँक, सेंट्रल बॅँक आॅफ इंडिया, डीसीबी बॅँक, देना बॅँक, फेडरल बॅँक, एचडीएफसी बॅँक, आईसीआईसीआई बॅँक, आईडीबीआई बॅँक, आईडीएफसी बॅँक, इंडियन बॅँक, इंडियन ओवरसीज बॅँक, इंडसइंड बॅँक, कर्नाटक बॅँक, करूर वैश्य बॅँक, कोटक महिंद्रा बॅँक, ओरिएंटल बॅँक आॅफ कॉमर्स, पंजाब नॅशनल बॅँक, आरबीएल बॅँक, साऊथ इंडियन बॅँक, स्टँडर्ड चार्टर्ड बॅँक, भारतीय स्टेट बॅँक, सिंडिकेट बॅँक, युनियन बॅँक आॅफ इंडिया, युनाइटेड बॅँक आॅफ इंडिया.. विजया बॅँक.