श्रेया नाईकचा मला अभिमान वाटतो- अक्षय कुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2016 4:36 AM
मुंबईतील अंधेरीत राहणारी १९ वर्षीय श्रेया नाईक सध्या सर्वांच्या चचेचा विषय बनली आहे.
मुंबईतील अंधेरीत राहणारी १९ वर्षीय श्रेया नाईक सध्या सर्वांच्या चचेचा विषय बनली आहे. ‘मला श्रेया नाईकचा प्रचंड अभिमान वाटतो’ असे म्हणत बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने श्रेयाचे तोंड भरुन कौतुक केले. कोण आहे ही श्रेया नाईक, तिने असे काय केलं आहे, ज्यामुळे अक्कीला तिचे कौतुक करावेसे वाटले.श्रेया नाईक ही मुंबईतील अंधेरीत राहणारी १९ वर्षीय तरुणी आहे. तिने एक असं धाडस केले आहे की, जे इतर मुलींना प्रेरणादायी ठरेल. तिच्या या धाडसाची थेट बॉलिवूडच्या खिलाडीने दखल घेतली आहे आणि तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. श्रेयानं काय धाडस केलं?श्रेयाला एकटी पाहून एका टवाळखोर तरुणाने तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरूवात केली. मात्र श्रेयाने त्याला न घाबरता धडा शिकविला. इतकच नव्हे तर त्या टवाळखोराला पोलिसांच्या ताब्यातही दिले. आता अशा धाडसी तरुणीचा अक्षयच काय संपुर्ण देशाला अभिमान वाटेल. पण श्रेयाच्या या धाडसाचे श्रेय जाते ते अक्षयला आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेला. दिल्लीत निर्भया प्रकरण झाल्यानंतर अक्षय कुमारने आदित्य ठाकरेंना सोबत घेऊन वुमन्स सेल्फ डिफेन्स सेंटर सुरू केले होतं. या सेंटरद्वारे महिला आणि मुलींना सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण दिलं जाते. अनेक महिला या प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. विशेष म्हणजे श्रेया नाईकही याच सेंटरमधील विद्यार्थीनी आहे. त्यामुळे अक्कीने श्रेयाच्या धाडसाची दखल घेतली व तिचे कौतुक केले.