स्ट्रेसफूल जॉबचा धोका ओळखा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:17 AM
स्ट्रेस आणि स्ट्रोकचा फार जवळचा संबंध आहे. एका संशोधनानुसार, तणावपूर्ण नोकरी करणार्यांना स्ट्रोकचा धोका अधिक असतो.
विशेष करून महिलांना हा धोका जास्त संभवतो. चीनमधील साऊदर्न मेडिकल विद्यापीठाच्या डिंगी झू म्हणतात, 'तणावामुळे हृदयाविषयक आजारांचा धोका असतो असे मानण्यात येते; मात्र याविषयी परफेक्ट संशोधन झाले नव्हते. स्ट्रेसफुल जॉबमुळे अवेळी जेवण, सिगारेटचे व्यसन, व्यायाम न करणे अशा अनेक वाईट सवयी लागतात. हेच कारण आहे की स्ट्रोकचा धोका वाढतो.' स्ट्रोक रिस्कसंबधी झालेल्या सहा संशोधनांचा डिंगी यांच्या टीमने विश्लेषन केले. यामध्ये १३८,७८२ लोकांचा अभ्यास करण्यात आला. या तुलनात्मक अभ्यासादरम्यान जॉबमध्ये असणार्या तणाव प्रमाणानुसार चार प्रकार करण्यात आले होते. वेळेचे बंधन, मानसिक तणाव आणि