असा वाढवा बाईकचा मायलेज !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2016 4:51 PM
दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत असून, याचा परिणाम बाईक धारकांच्या खिशावर नक्कीच पडतो. शिवाय भारतात बाईक चालविणाºयांची संख्याही वाढत असल्याने पेट्रोलची मागणी वाढली आहे. यामुळेच किमतीत वाढ होत असते.
दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत असून, याचा परिणाम बाईक धारकांच्या खिशावर नक्कीच पडतो. शिवाय भारतात बाईक चालविणाऱ्याची संख्याही वाढत असल्याने पेट्रोलची मागणी वाढली आहे. यामुळेच किमतीत वाढ होत असते. या किमती कमी करणे जरी आपल्या हातात नाही, मात्र आपल्याला जास्त पेट्रोल लागू नये म्हणून प्रयत्न करु शकतो.बाईक चालविताना बहुतांश लोक बऱ्याच चुका करीत असतात. नेमक्या ह्याच चुकांमुळे बाईकच्या मायलेजवर परिणाम होतो. या चुका जर आपण सुधारल्या तर आपण कित्येक लीटर पेट्रोल वाचवू शकता. ते कसे वाचविता येईल याबाबत खालील टिप्स फॉलो करा.* टू व्हीलरला सारख्याच स्पीडमध्ये चालवण्याचा प्रयत्न करा. स्पीड मेंटेन ठेवल्यास बाईकचे मायलेज वाढते.* बाईक चालवताना क्लच दाबून ठेऊ नका. असे केल्यावर बाईक मायलेज कमी देईल. क्लच आवश्यकतेनुसारच दाबा, मायलेजमध्ये फरक जाणवेल. * फोर स्ट्रोक इंजिनसाठी, बाईकला चॉक आणि सेल्फ स्टार्ट सोबतच चालू करा. त्यानंतर एक्सिलेटर न देता १०-१५ सेकंद चालू ठेवा. पेट्रोलला इंजिनपर्यंत जाण्यासाठी वेळ मिळेल.* बाईक चालवताना बाईकला टॉपगिअर वरून पहिल्या गिअरवर आणू नका. याने पेट्रोलची कार्यक्षमता कमी होते. * बाईक चालवताना ब्रेक दाबून ठेऊ नका, अशाने मायलेज कमी मिळते. * ट्रॅफिक सिग्नलवर रेडलाइट 30 सेकंदापेक्षा जास्त असेल तर बाईकचे इंजिन बंद करा. काही प्रमाणात मायलेजवर फरक पडू शकतो. * टू व्हीलरचे मायलेज कायम ठेवायचे असेल तर वेळेवर इंजिन आॅइल चेंज करणे आणि सोबतच सर्व्हिसिंग करणे फायद्याचे ठरेल.